Jaywant Wadkar : 'नवरा माझा नवसाचा'मध्ये प्रशांतही होता पण रिडिंगच..., प्रशांत दामले चित्रपटात न दिसण्याचं जयवंत वाडकरांनी सांगितलं कारण
Prashant Damle in Navra Maza Navsacha : नुकतच नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात झाली आहे. पण त्याआधी आलेल्या नवरा माझा नवासाचा या चित्रपटात प्रशांत दामलेंनीही भूमिका साकारली होती.
Prashant Damle in Navra Maza Navsacha : सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) दिग्दर्शित 'नवरा माझा नवसाचा' (Navra Maza Navsacha ) हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या तितकाच आवडीचा आहे. त्यातच नुकतच 'नवरा माझा नवसाचा 2' (Navra Maza Navsacha 2) या चित्रपटाची घोषणा झाली असून या चित्रपटाच्या शुटींगला देखील सुरुवात झाली आहे. नवरा माझा नवसाचा या चित्रपटात अनेक कलाकारांनी पाहुणे कलाकार म्हणून काम केलं. त्यामुळे अनेक कलाकार मंडळींनी हा चित्रपट एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला.
पण तुम्हाला माहितेय का या चित्रपटात जशी सोनू निगम, रिमा लागू यांनी पाहुणे कलाकाराची भूमिका साकारली होती, त्याचप्रमाणे प्रशांत दामलेंनीही या चित्रपटात पाहुणे कलाकार म्हणून हजेरी लावली होती. नुकतच जयवंत वाडकर यांनी ‘महाएमटीबी’च्या पॉडकास्टमध्ये यावर भाष्य केलं आहे. सिनेमाची वेळ खूप जास्त व्हायला लागली त्यामुळे प्रशांत दामलेंचा सिन कट कारावा लागल्याचं यावेळी जयवंत वाडकर यांनी संगितलं.
म्हणून प्रशांतला कट करावा लागला - जयवतं वाडकर
आम्ही नवरा माझा नवसाचा चित्रपटाच्या रिंडिंगला सुरुवात केली. संतोष पवारने तो लिहिला होता. माटुंग्याला आम्ही सगळे बसलो होतो. मला एक सवय आहे रिंडिंग करताना मी घड्याळ लावतो. आम्ही सगळ्यांनी रिडिंग केलं. रिडिंग झाल्यानंतर मला समजलं की, सव्वा तीन तास झाले आहेत. त्यावेळी मी सचिनला सांगतिलं की सव्वा तीन तास झाले. ते म्हणाले काय एवढा वेळ झाला. त्यावेळीच आम्ही प्रशांतचा सीन कट केल्याचं जयवतं वाडकर यांनी यावेळी म्हटलं.
'ही' भूमिका साकारणार होते प्रशांत दामले
प्रशांत दामलेही रिमा लागू्प्रमाणेच पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार होता. प्रशांत गाडीत येतो तो अंताक्षरी खेळतो आणि त्याला तो पुतळा दिसतो. त्यानंतर तो गाडीतून उतरुन जातो असा सगळा तो सीन होता. पण गोष्ट खूप लांबत असल्याने प्रशांतचा सिन कट करावा लागला, असं जयवंत वाडकर यांनी सांगितलं.
'नवरा माझा नवासाचा 2' च्या शुटींगला सुरुवात
'नवरा माझा नवसाचा 2' (Navra Maza Navsacha 2) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर या चित्रपटाच्या शुटींगलाही सुरुवात झाली आहे. नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची देखील प्रेक्षकांना बरीच उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पुन्हा एकदा मनोरंजनाची पर्वणी मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.
ही बातमी वाचा :
Manasi Naik : मानसी नाईक पुन्हा लग्नगाठ बांधणार? प्रेमात पडल्याची अभिनेत्रीने दिली कबुली