![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Telly Masala : मुक्तासाठी सागर इंद्राला सुनावणार; आदित्यला लागली कोळी कुटुंबाची ओढ ते कुणाल कपूर आणि एकता कपूर यांचा घटस्फोट; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
![Telly Masala : मुक्तासाठी सागर इंद्राला सुनावणार; आदित्यला लागली कोळी कुटुंबाची ओढ ते कुणाल कपूर आणि एकता कपूर यांचा घटस्फोट; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या... Telly Masala Marathi Movie Marathi Serial Latest Update Premachi Goshta Star Pravah Serial today Episode update Kunal Kapur Celebrity Cheif Divoreced with wife Ekta Kapur Entertainment Bollywood Latest Update Marathi News Telly Masala : मुक्तासाठी सागर इंद्राला सुनावणार; आदित्यला लागली कोळी कुटुंबाची ओढ ते कुणाल कपूर आणि एकता कपूर यांचा घटस्फोट; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/04/4c275c017b325449d980596c642150e71712223418342720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Premachi Goshta Marathi Serial Updates : मुक्तासाठी सागर इंद्राला सुनावणार; आदित्यला लागली कोळी कुटुंबाची ओढ; प्रेमाची गोष्टमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय होणार?
दुखावलेल्या मुक्ताची समजूत काढण्यासाठी सागरचे आटोकाट प्रयत्न सुरू असतात. तर, मुक्ता त्याला दाद देत नाही. मुक्तासाठी सागर इंद्रालादेखील सुनावणार आहेत. तर, दुसरीकडे कार्तिकचा विकृत चेहरा आज प्रेक्षकांसमोर येणार आहे. 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Gosht) मालिका आता रंगतदार वळणाकडे जात आहे. मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये काय पाहणार?
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Kunal Kapur Divorced : कुणाल कपूर आणि एकता कपूर यांचा घटस्फोट, लग्नाच्या 16 वर्षांनंतर घेतला विभक्त होण्याचा निर्णय
प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (Kunal Kapoor) याने 2008 मध्ये एकता कपूर नावाच्या महिलेशी लग्न केलं आहे. लग्नाच्या चार वर्षांनंतर म्हणजेच 2012 मध्ये त्यांनी एका मुलाला देखील जन्म दिला होता. पण लग्नाता आता 16 वर्ष झाल्यानंतर या दोघांचं नातं तुटलंय. कुणालने त्याच्या घटस्फोटाच्या अर्जामध्ये त्याच्या पत्नीवर गंभीर आरोप केले होते.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Manoj Jarange Patil Maratha Reservation : 'वचनाची राखतो आब...हा मर्दमावळा शिवरायांचा वाघ', मनोज जरांगेवरील 'संघर्षयोद्धा' चित्रपटातील गाणं प्रदर्शित
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) निर्णायक लढा उभारणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा जीवनपट उलगडून दाखवणारा ''संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील'' (Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil) हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. अजय गोगावले यांच्या आवाजात स्वरबद्ध झालेले उधळीन मी... हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर आता दुसरं गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे. 'वचनाची राखतो आब...हा मर्दमावळा शिवरायांचा वाघ' हे धडाकेबाज गाणं लाँच करण्यात आले आहे. दिव्य कुमार यांच्या दमदार आवाजात हे गीत स्वरबद्ध करण्यात आले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Prasad Oak : 'मला शरदचंद्र पवारांची भूमिका साकारायला आवडेल', प्रसाद ओकने व्यक्त केली इच्छा
धर्मवीर चित्रपटात प्रसाद ओकने (Prasad Oak) साकारलेल्या आनंद दिघे यांच्या भूमिकेचं आजही कौतुक होतं. खरंच आनंद दिघे परत आले, अशा प्रतिक्रिया अनेकांनी प्रसादला दिल्या होत्या. धर्मवीर चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या शुटींगला देखील सुरुवात करण्यात आलीये. चंद्रमुखी, हिरकणी, कच्चा लिंबू अशा दर्जेदार चित्रपटांचं दिग्दर्शनंही प्रसादने केलं आहे. दरम्यान त्याने कोणावर बायोपिक बनवायला आवडेल या प्रश्नाचं उत्तर देताना शरद पवारांचा देखील उल्लेख केला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Taapsee Pannu Wedding : लग्नानंतर तापसी पन्नूची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाली 'आता मी आयुष्य...'
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)