(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kunal Kapur Divorced : कुणाल कपूर आणि एकता कपूर यांचा घटस्फोट, लग्नाच्या 16 वर्षांनंतर घेतला विभक्त होण्याचा निर्णय
Kunal Kapur Divorced : सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर याने एकता कपूर नावाच्या महिलेसोबत 2008 मध्ये लग्न केलं होतं. पण आता त्यांचा घटस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.
Kunal Kapur Divorced : प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (Kunal Kapoor) याने 2008 मध्ये एकता कपूर नावाच्या महिलेशी लग्न केलं आहे. लग्नाच्या चार वर्षांनंतर म्हणजेच 2012 मध्ये त्यांनी एका मुलाला देखील जन्म दिला होता. पण लग्नाता आता 16 वर्ष झाल्यानंतर या दोघांचं नातं तुटलंय. कुणालने त्याच्या घटस्फोटाच्या अर्जामध्ये त्याच्या पत्नीवर गंभीर आरोप केले होते.
दिल्ली हायकोर्टाने कुणालच्या घटस्फोटाला मंजूरी दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कोर्टाचं म्हणणं आहे की, त्याच्या पत्नीची कुणालसोबतची वागणूक ही योग्य नव्हती. फॅमिली कोर्टाने कुणालच्या घटस्फोटाचा अर्ज मान्य केला नव्हता. त्यानंतर कुणालने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली.
लग्नाच्या 16 वर्षांनंतर घटस्फोट
कुणालने 2008 मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर चार वर्षांनंतर त्यांनी एका मुलाला देखील जन्म दिला. पण लग्नाच्या 16 वर्षानंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. कुणालने घटस्फोटाची याचिका दाखल करत पत्नीवर गंभीर आरोप केलेत. त्याच्या पत्नीने कधीच माझ्या आईवडिलांचा आदर केला नसल्याचं कुणालने म्हटलं आहे. ती नेहमीच माझ्या घरच्यांना अपमानित करत आली आहे. त्याचप्रमाणे त्याच्या बायकोचं म्हणणं आहे की, मी कायमचं एका बायकोचं कर्तव्य निभावलं आहे. तसेच मी नेहमीच माझा नवरा आणि कुटुंबच्या प्रती प्रामाणिक राहिला असल्याचंही तिच्या बायकोनं म्हटलं आहे.
View this post on Instagram
कोर्टाने कुणालच्या बाजूने दिला निर्णय
दिल्ली कोर्टाने कुणालच्या बाजूने निर्णय दिला असून त्याच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याचही म्हटलं. खोटे आरोप लावून त्याची पब्लिक इमेज खराब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही यावेळी कोर्टानं म्हटलं आहे. त्यानंतर कोर्टानं कुणालच्या बाजूने निर्णय दिला आहे.
कुणाल हा दिल्लीला राहणार असून लहानपणापासूनच त्याला जेवण बनवण्याची आवड होती. त्यानंतर त्याने त्यातच करिअर करण्याचा निर्णय घेतला. सध्या कुणाल हा सेलिब्रेटी शेफ म्हणून प्रसिद्ध आहे.
View this post on Instagram