Premachi Goshta Marathi Serial Updates : मुक्तासाठी सागर इंद्राला सुनावणार; आदित्यला लागली कोळी कुटुंबाची ओढ; प्रेमाची गोष्टमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय होणार?
Premachi Goshta Marathi Serial Updates : मुक्ताची समजूत काढण्यासाठी सागरचे आटोकाट प्रयत्न सुरू असतात. तर, दुसरीकडे कार्तिकचा विकृत चेहरा आज प्रेक्षकांसमोर येणार आहे.
Premachi Goshta Marathi Serial Updates : दुखावलेल्या मुक्ताची समजूत काढण्यासाठी सागरचे आटोकाट प्रयत्न सुरू असतात. तर, मुक्ता त्याला दाद देत नाही. मुक्तासाठी सागर इंद्रालादेखील सुनावणार आहेत. तर, दुसरीकडे कार्तिकचा विकृत चेहरा आज प्रेक्षकांसमोर येणार आहे. 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Gosht) मालिका आता रंगतदार वळणाकडे जात आहे. मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये काय पाहणार?
मुक्ताची समजूत काढण्यासाठी सागरचे प्रयत्न सुरूच...
सागर मुक्ताची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, नाराज असलेली मुक्ता सागरला दाद देत नाही. मी तुमची बायको आहे, हीच माझ्यासाठी शिक्षा आहे असे म्हणते. तुम्हाला नफा कुठे आहे हे सगळे कळतं असे मुक्ता सागरला म्हणते. मला माझं आयुष्य जगू द्या, एवढे उपकार करा असे मुक्ता सागरला म्हणते. सागर-मुक्ताचे बोलणं सुरू असताना दुसरीकडे सई येते आणि सागरला स्वत: बनवलेले ग्रीटिंग कार्ड देते. सईच्या आडून जवळ येऊ नका असेही मुक्ता सागरला बजावते.
आदित्यला कोळी कुटुंबाची लागली ओढ
फॅमिलीसोबत होळी सेलिब्रेट केल्याने खूप बरं वाटतंय असे आदित्य सावनीला सांगतो. आपण पप्पांना भेटायला जाऊयात का, असे आदित्य सावनीला सांगतो. सागर पुन्हा विश्वासघात करेल असे सावनी आदित्यला सांगते. पण, आदित्य पप्पा असे करणार नाही असे सांगतो.
कार्तिकचे खरं रुप कळणार का?
आतापर्यंत चांगला, सोज्जवळ प्रतिमा असलेल्या कार्तिकचे खरे रुप अजूनही समोर आले नाही. कार्तिक हा बाहेरख्याली करणारा असल्याचे घरात कळणार का? कार्तिकही मुक्ताला स्पर्श करण्याची संधी सोडत नाही. कार्तिकच्या स्पर्शाने मुक्ता अवघडल्यासारखी होते.
इंद्रा मुक्तावर पुन्हा चिडणार
इंद्राला मुक्तावर चिडण्यासाठी कारण लागते. मुक्ता आपल्या अपॉईंटमेंटसाठी क्लिनिकला जाण्यासाठी निघते. पण इंद्राला ही बाब खटकते, सागर बरे वाटत नसताना क्लिनिकला कसे जाते असे मुक्ताला विचारते. तर, दुसरीकडे सागर मुक्ताची बाजू घेतो आणि तिला अडवू नको असे सांगतो. सागर मुक्ताची बाजू घेत असल्याची बाब इंद्राला खटकते. इंद्रा त्यावरून बोल लावते. मुक्ताला वारंवार बोल लावत असल्याने सागर इंद्रावर चिडतो. त्यांचे काम आणि माझ्या कामा इतकेच महत्त्वाचे असते असे सागर इंद्राला सुनावतो.