एक्स्प्लोर

Telly Masala : अनुराधा पौडवाल यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर ते 'शिंदेशाही'तील गायकीचा हिरा हरपला; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Anuradha Paudwal : अनुराधा पौडवाल यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर, आरती टिकेकर,रोहिणी हट्टंगडी यांचाही होणार गौरव

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यामध्ये 2024 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांना जाहीर झाला आहे. यासोबतच शास्त्रीय संगीतामधील योगदानासाठी आरती अंकलीकर-टिकेकर, सिनेमाक्षेत्रातील योगदानासाठी रोहिणी हट्टंगडी या कलाकारांचा गौरव होणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Anand Shinde Brother Dinkar Shinde Passed Away : 'शिंदेशाही'तील गायकीचा हिरा हरपला, शिंदे कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

अनेक दशकांपासून आंबेडकरी गीतांपासून भक्ति गीतांपर्यंत शिंदे कुटुंबाचा गायनाच्या क्षेत्रात दबदबा आहे. प्रल्हाद शिंदे यांच्यापासून सुरू झालेला हा प्रवास शिंदेशाही घराण्यापर्यंत आला आहे. याच शिंदेशाही घराण्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्रल्हाद शिंदे (Prahlad Shinde) यांच्या गायनाचा वारसा पुढे नेणारे, आनंद शिंदे (Anand Shinde) यांचे धाकटे बंधू गायक दिनकर प्रल्हाद शिंदे (Dinkar Shinde) यांचे निधन झाले आहे. त्यांचा पुतण्या, गायक उत्कर्ष शिंदे (Utkarsh Shinde) याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित माहिती दिली आहे.  

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan : शेवटी आलोय, शेवटीच जाणार... ट्रॉफी तर मीच नेणार; गुलिगत सूरजचं ठरलं, एकदम पक्क केलं

  'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या सीझनला (Bigg Boss Marathi Season 5) आता रंग चढू लागला आहे. बिग बॉसचा तिसरा आठवडा सुरू झाला असून बहुतांशी सगळेच स्पर्धक आता आपला खेळ खेळू लागले आहेत. बिग बॉस मराठीच्या या सीझनमध्ये सोशल मीडियावर धमाल उडवून देणारे रील स्टार्सही आहेत. यातही गुलिगत धोका म्हणून सोशल मीडियावर धुरळा उडवणाऱ्या सूरज चव्हाणने (Suraj Chavan) सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. बिग बॉसची ही ट्रॉफी मीच जिंकणार असा पक्का निर्धारच सूरजने केला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Bigg Boss Marathi Season 5 Day 17 : बाळाचे कपडे फाडले, हाल केले...भावनांच्या खेळात सगळे झाले भावशून्य; 'बिग बॉस' घेणार सदस्यांविरोधात अॅक्शन

'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन (Bigg Boss Marathi Season 5) सध्या सुरू आहे. बिग बॉसच्या घरात टास्कच्या दरम्यान वादावादी सुरू असते. यातून अनेकदा घरातील स्पर्धक आक्रमक होतात. मात्र, सोमवारी बिग बॉसने दिलेल्या टास्कमध्ये घरातील सदस्य भावशून्य होऊन खेळले. त्यामुळे आता बिग बॉस नाराज झाले असून घरातील सदस्यांविरोधात अॅक्शन घेणार आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Munawar Faruqui Apologises :  'माझं कोकणावर खूप खूप प्रेम...', मुनव्वर फारुकीने मागितली जाहीर माफी

मुंबईतील एका स्टँडअप कॉमेडी कार्यक्रमादरम्यान मुनव्वर फारुकीने (Munawar Faruqui) वापर केलेल्या शब्दप्रयोगामुळे राजकीय वातावरण चांगलच तापलं होतं. कोकणी माणसाविषयी उल्लेख करताना मुनव्वरने शिवीचा वापर केला होता. त्यामुळे त्याच्याविरोधात मनसे आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळालं. त्याचप्रमाणे नितेश राणे यांनी देखील त्याला इशारा दिला होता. त्यानंतर आता मुनव्वरने सगळ्यांची जाहीर माफी मागितली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
Embed widget