एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Telly Masala : निधनाच्या व्हायरल पोस्टवर श्रेयस तळपदेचा संताप ते आदिनाथ कोठारेच्या दिग्दर्शनातील पहिल्या चित्रपटाची रिलीज डेट समोर; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly Masala : सध्या मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Badlapur Case : चिमुरडींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या, मराठी अभिनेत्रींनी केली थेट मागणी...

Badlapur Case : बदलापूर पूर्व मधील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणानं आज अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. या अत्याचाराविरोधात बदलापूरकरांनी आंदोलनाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे. सकाळी 6.30 वाजल्यापासून शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ सुरू झालेल्या आंदोलनाने संपूर्ण शहरभरात पेट घेतला. आरोपींना फाशीची मागणी आंदोलकांनी केली आहे. मराठी सिनेइंडस्ट्रीमधूनही या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबने (Shivali Parab) ही फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 

एखाद्याच्या मरणावर का उठलात? मी जिवंत आहे, निधनाच्या व्हायरल पोस्टवर श्रेयसने व्यक्त केला संताप

Shreyas Talpade :  अभिनेता श्रेयस तळपदेबद्दल (Shreyas Talpade ) एक खोटी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये श्रेयसच्या मृत्यूची खोटी बातमी होती. ही बातमी पाहून श्रेयसच्या चाहत्यांना धक्काच बसला. श्रेयस तळपदेने स्वत: पोस्ट करून फेक न्यूजवर संताप व्यक्त केला. माझी प्रकृती चांगली असून मी जिवंत असल्याचे श्रेयसने स्पष्ट केले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..

 

Salim Javed The Angry Young Man : 24 पैकी 22 चित्रपट ब्लॉकबस्टर, तरी का तुटली सलीम-जावेदची जोडी? कारण आलं समोर...


Salim Javed The Angry Young Man :  बॉलिवूडमध्ये अभिनेता-अभिनेत्रीसोबत लेखक-पटकथाकारही तेवढाच महत्त्वाचा असल्याचे सलीम-जावेद (Salim- Javed) या जोडगोळीने अधोरेखित केले. सलीम खान (Salim Khan) आणि जावेद अख्तर (Javed Akhtar) या जोडीने  एकत्रितपणे 24 चित्रपटांची कथा-पटकथा लिहिली. त्यातील  22 चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरले. मात्र, बॉलिवूड गाजवणारी ही जोडी फुटल्याने सिनेसृष्टीत खळबळ उडाली होती. ही जोडी का फुटली, याचे कारण समोर आले आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 

Yuvraj Singh Biopic : 'सिक्सर किंग'च्या बायोपिकची घोषणा! MS धोनीनंतर युवराजवर बनणार चित्रपट; कोण असणार हिरो?


Yuvraj Singh Biopic Announced : टीम इंडियाचा महान अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघातील या दिग्गज खेळाडूच्या बायोपिकची घोषणा करण्यात आली आहे. तरण आदर्शने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 

Marathi Movie Updates : 'बाहुबली'च्या कालकेयची मराठीत एन्ट्री, अभिनेते प्रभाकर मराठी चित्रपटात झळकणार


Marathi Movie :  ‘बाहुबलीः द बिगिनिंग’ चित्रपटात प्रभास,  राणा दुग्गबती, अनुष्का शेट्टी, तमन्ना यांच्यासोबत खलनायक कालकेयची भूमिका चांगलीच गाजली होती. कालकेयच्या व्यक्तीरेखेने चित्रपटात आपली वेगळीच छाप सोडली होती. बाहुबली मध्ये धडकी भरवणाऱ्या कालकेयची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता प्रभाकर यांनी साकारली होती.  या  'कालकेय'च्या भूमिकेने प्रभाकर यांना नवी ओळख मिळाली. ही भूमिका साकारणारे अभिनेते प्रभाकर  आता मराठी चित्रपटात दिसणार आहे.  आगामी 'अहो विक्रमार्का' या चित्रपटात प्रभाकर झळकणार आहे. 

बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा...

 

Paani Marathi Movie :  सिनेइंडस्ट्रीतील तीन दिग्गज पहिल्यांदाच एकत्र, आदिनाथ कोठारेच्या दिग्दर्शनातील पहिल्या चित्रपटाची रिलीज डेट समोर...

Paani Marathi Movie :  सिनेइंडस्ट्रीतील तीन दिग्गज प्रोडक्शन हाऊस पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. राजश्री एंटरटेन्मेंट आणि प्रियांका चोप्राची पर्पल पेबल पिक्चर्स, कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पाणी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) आता पदार्पण करत आहे. हा चित्रपट 18 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. 'पाणी'च्या निमित्ताने हिंदी सिनेसृष्टीत ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे राजश्री एंटरटेन्मेंट पहिल्यांदाच मराठी चित्रपटाच्या निर्मितीत उतरले आहे. 

बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा..

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rishabh Pant IPL 2025 : रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
Parth Pawar: अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; मी अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; मी अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
Mumbai Indians : लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
Eknath Shinde  : एकनाथ शिंदेंनी अर्थशास्त्र बघून नव्हे तर ह्रदयशास्त्र पाहून काम केलं, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, सुधीर मुनगंटीवार म्हणाले...
एकनाथ शिंदे म्हणाले नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा निर्णय मान्य, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, मुनगंटीवार म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Pawar PC | निवडणूक आयोगाने आम्ही सांगू ती मशीन कॅमेऱ्याच्या निगराणीखाली उघडावीत- रोहित पवारABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 11 November 2024Eknath Shinde Full PC : थोडं भावनिक, थोडं आक्रमक...एकनाथ शिंदे यांचं FAREWELL SPEECH? ABP MAJHAEknath Shinde Shayri | जीवन मे असली उडान अभी बाकी है, शायरी म्हणत मांडली शिंदेंनी भावना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rishabh Pant IPL 2025 : रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
Parth Pawar: अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; मी अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; मी अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
Mumbai Indians : लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
Eknath Shinde  : एकनाथ शिंदेंनी अर्थशास्त्र बघून नव्हे तर ह्रदयशास्त्र पाहून काम केलं, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, सुधीर मुनगंटीवार म्हणाले...
एकनाथ शिंदे म्हणाले नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा निर्णय मान्य, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, मुनगंटीवार म्हणाले...
Eknath Shinde Full PC : थोडं भावनिक, थोडं आक्रमक...एकनाथ शिंदे यांचं FAREWELL SPEECH? ABP MAJHA
Eknath Shinde Full PC : थोडं भावनिक, थोडं आक्रमक...एकनाथ शिंदे यांचं FAREWELL SPEECH? ABP MAJHA
Eknath Shinde PC : भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा,  मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा, मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
Ekanath Shinde : महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदेंचं स्थान काय? मुख्यमंत्र्यांचं स्पष्टच उत्तर; भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा
महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदेंचं स्थान काय? मुख्यमंत्र्यांचं स्पष्टच उत्तर; भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा
Prithvi Shaw : ज्याची तुलनाच लहान वयात सचिन सेहवागशी झाली तोच थेट जमिनीवर आला, पाँटिंगही हबकला; पृथ्वी शॉचं 'विमान' इतक्यात स्वस्तात जमिनीवर का आलं?
ज्याची तुलनाच लहान वयात सचिन सेहवागशी झाली तोच थेट जमिनीवर आला, पाँटिंगही हबकला; पृथ्वी शॉचं 'विमान' इतक्यात स्वस्तात जमिनीवर का आलं?
Embed widget