Zee Marathi: 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर खिलाडी अक्षय कुमारचा जबरदस्त परफॉर्मन्स
Zee Marathi: 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर खिलाडी अक्षय कुमार, जॅकी श्रॉफ आणि रोहित शेट्टी हजेरी लावणार आहेत.
Chala Hawa Yeu Dya: झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या आणि त्यातील विनोदवीर वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांकडून या कार्यक्रमाला पसंती मिळत आहे. या कार्यक्रमाची लोकप्रियता प्रचंड आहे. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारदेखील त्यांच्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर येत असतात. येत्या आठवड्यात बॉलिवूड सुपरस्टार 'अक्षय कुमार', 'जॅकी श्रॉफ' आणि 'रोहित शेट्टी' 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर हजेरी लावणार आहेत.
खिलाडी अक्षय कुमारने फक्त 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर हजेरीच लावली नाही तर त्याच्या ढासू स्टाईलमध्ये एक जबरदस्त परफॉर्मन्स सुद्धा केला. त्याचा हा परफॉर्मन्स इतका अफलातून होता कि टाळ्या आणि शिट्या थांबतच नव्हत्या. हे सर्व कलाकार त्यांचा आगामी सिनेमा सूर्यवंशीच्या प्रमोशनच्या निमित्ताने 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर आले होते.
Netflix New Releases : प्रेक्षकांसाठी Netflix वर 'चित्रपट' आणि 'शो'ची मेजवाणी; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
निलेश साबळेने सोशल मीडियावर अक्षय कुमारसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही खूप खूश दिसत आहेत. हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, 'आ रही है पुलिस, सुपरस्टार खिलाडी येणार, आपल्या मंचावर दंगा होणार, दिवाळीचा सुपरहिट धमाका. सुर्यवंशी'ची आणि 'चला हवा येऊ द्या' ची कॉमेडी अॅक्शनच्या माध्यमाने पहिल्यांदाच अक्षयकुमार यांचा मराठमोळा अंदाज पहायला मिळणार आहे.
Rohit Shetty New Project: Rohit Shetty च्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसून दिसून येणार Sidharth Malhotra
सोशल मीडियावर या विशेष एपिसोडमधील एक सीनदेखील शेअर केला आहे. याची झलक पाहून प्रेक्षकांना हसणे आवरणार नाही. हा व्हिडिओ पाहून नक्कीच अंदाज लावू शकतो की, येत्या आठवड्यात 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर आपल्याला धमाल मस्ती पाहायला मिळणार आहे.