Tuzech Mi Geet Gaat Aahe: उर्मिला कोठारेनं 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेच्या शूटिंगदरम्यानचा व्हिडीओ केला शेअर; म्हणाली, 'ये नाइंसाफी हैं या....'
तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेत अभिनेत्री उर्मिला कोठारे (Urmilla Kothare) मंजुळा ही भूमिका साकारते.
Tuzech Mi Geet Gaat Aahe: छोट्या पडद्यावरील तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या मालिकेत अभिनेत्री उर्मिला कोठारे (Urmilla Kothare) ही मंजुळा ही भूमिका साकारते. नुकताच मंजुळा म्हणजेच ऊर्मिलानं तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या सेटवरील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
ऊर्मिलानं शेअर केला व्हिडीओ
उर्मिला कानेटकरनं एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ऊर्मिलानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तुझेच मी गीत गात आहे या मालिकेमधील स्वराज आणि या मालिकेचे दिग्दर्शक दिसत आहेत. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, उर्मिला म्हणते, "आम्ही उन्हात शूटिंग करत आहोत. आमचे दिग्दर्शक आम्हाला उन्हात शूटिंग करायला लावून, स्वत: सावलीत बासले आहेत. त्यांच्यासमोर फॅन देखील आहेत. क्या ये नाइंसाफी हैं या नही? आम्हा कमेंट करुन सांगा." ऊर्मिलानं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक नेटकऱ्यांनी उर्मिलानं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट्स केल्या आहेत.
View this post on Instagram
तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत मल्हार कामत ही भूमिका अभिनेता अभिजीत खांडकेकर हा साकारतो तर स्वरा उर्फ स्वराज ही भूमिका अवनी तायवाडे ही साकारते. तसेच या मालिकेमध्ये मोनिका मल्हार कामत ही भूमिका प्रिया मराठे ही साकारते आणि स्वराची आई म्हणजेच वैदेही मल्हार कामत ही भूमिका अभिनेत्री उर्मिला कानेटकर ही साकारते. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.
उर्मिला कोठारेने तब्बल 12 वर्षांनंतर तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर कमबॅक केलं होतं. उर्मिलाने साकारलेली वैदेहीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. पण मालिकेत वैदेही या भूमिकेचं निधन झालं, असं दाखवण्यात आलं. त्यानंतर आता उर्मिला ही या मालिकेत मंजुळा ही भूमिका साकारत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Tuzech Mi Geet Gaat Aahe: गुंडांनी स्वराजचं केलं अपहरण; मंजुळा, मल्हार स्वराजला वाचवायला जाणार?