Tuzech Mi Geet Gaat Aahe : स्वराचा होणार स्वराज, ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत नवा ट्विस्ट!
Tuzech Mi Geet Gaat Aahe : वेश बदलून स्वरा आता आपल्या बाबांचा शोध घेणार आहे. याच कारणास्तव स्वराने आता स्वराज हे रूप धारण केलं आहे.
Tuzech Mi Geet Gaat Aahe : स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक मनापासून प्रेम करत आहेत. लवकरच मालिकेत एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच स्वराने आपल्या आईला गमावलं. आईचं छत्र हरपल्यानंतर आता स्वरा आपल्या बाबांच्या शोधात निघाली आहे. मात्र, तिचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. बाबांना शोधण्याच्या या प्रवासात सर्वात मोठी अडसर आहे ती म्हणजे स्वराची मामी. याच कारणामुळे स्वराला आपल्या केसांना कैची लावावी लागणार आहे.
वेश बदलून स्वरा आता आपल्या बाबांचा शोध घेणार आहे. याच कारणास्तव स्वराने आता स्वराज हे रूप धारण केलं आहे. स्वराला तिचे बाबा भेटणार का?, हे मालिकेच्या पुढील भागांमध्ये कळणार आहे.
स्वराची आई घेणार जगाचा निरोप
'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत मल्हारची बायको आणि स्वराच्या आईचे वैदेहीचे पात्र उर्मिला कोठारे साकारत होती. आता मालिकेत स्वराच्या आईचे निधन झाले आहे. त्यामुळे मालिकेच्या कथानकानुसार उर्मिला कोठारेने मालिकेमधून एक्झिट घेतली आहे. मात्र, ती स्वराच्या आठवणींमध्ये कायम दिसणार आहे. मालिकेत वैदेहीला कँन्सर असल्याचे दाखवण्यात आले होते. उपचारासाठी पैसे मिळत नसल्याने तिचा मृत्यू झालेला दाखवण्यात आला आहे.
आई गेल्यानंतर स्वराच्या आयुष्तील कठीण काळ सुरु झाला आहे. स्वराचा मामा तिला मामीच्या जाचापासून वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न करतो. मात्र, तरीही स्वराची मामी तिला पुन्हा पुन्हा त्रास देते. या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी मामाच तिला मुलगा बनवून बाबांचा शोध घेण्याची नवी योजना आखणार आहे.
मालिकेत भावनिक वळण
आईचा जीव वाचवण्यासाठी स्वराने बरेच प्रयत्न केले. पण आपल्या आईचा जीव ती वाचवू शकली नाही. 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेतील हे अत्यंत भावनिक वळण आहे. मालिकेत हा भावनिक प्रसंग शूट करणं संपूर्ण टीमसाठी आव्हानात्मक होतं. सेटवर हा प्रसंग शूट करताना सगळेच भावूक झाले होते. चिमुकल्या स्वरानेही हा सीन साकारण्यासाठी खूप मेहनत घेतली होती.
संबंधित बातम्या