Tuzech Mi Geet Gaat Aahe: गुंडांनी पुन्हा मंजुळाला पकडून नेलं; 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा प्रोमो व्हायरल
नुकताच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, गुंडांनी मंजुळाला पुन्हा पकडून नेलं आहे.
Tuzech Mi Geet Gaat Aahe: तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेत मोठा ट्वीस्ट येणार आहे. नुकताच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, गुंडांनी मंजुळाला पुन्हा पकडून नेलं आहे. आता मंजुळाची गुंडांपासून सुटका होईल की नाही? या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहे.
तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, स्वराज उर्फ स्वरा आणि निरंजन हे दोघे मंजुळा भेटायला आले आहेत, तेवढ्यात काही गुंड तिथे येतात आणि मंजुळाला पकडून घेऊन जातात. स्वराजला त्या गुंडांना थांबवायला जायचं असतं पण निरंजन त्याला जाऊ देत नाही.
गुंड हिऱ्यांसाठी मंजुळाला पकडतात. मंजुळानं ते हिरे स्वराजकडे असलेल्या माऊथ ऑर्गनमध्ये लपवलेले असतात. आता मंजुळा ही गुंडाना हिरे देईल का? स्वराज आणि मंजुळाची पुन्हा भेट होईल का? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आगामी एपिसोडमध्ये मिळणार आहेत.
पाहा प्रोमो
View this post on Instagram
याआधी देखील गुडांनी मंजुळाचे अपहरण केले होते. त्यावेळी मंजुळा आणि स्वराज या दोघांनाही गुंडांनी पकडलं होते. तेव्हा मल्हार हा स्वराजला वाचवायला गेला होता.
'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेतील कलाकार
तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेत मल्हार कामत ही भूमिका अभिनेता अभिजीत खांडकेकर (Abhijeet Khandkekar) हा साकारतो तर स्वरा उर्फ स्वराज ही भूमिका अवनी तायवाडे ही साकारते. तसेच या मालिकेमध्ये मोनिका मल्हार कामत ही भूमिका प्रिया मराठे (Priya Marathe) ही साकारते आणि स्वराची आई म्हणजेच वैदेही मल्हार कामत ही भूमिका अभिनेत्री ऊर्मिला कानेटकर ही साकारते. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.
इतर महत्वाच्या बातम्या: