Tuzech Mi Geet Gaat Aahe: स्वराजला गुंडांच्या तावडीतून सोडवण्यासाठी मल्हार पोहोचला; 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेचा प्रोमो व्हायरल
तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये मल्हार हा गुंडांसोबत फायटिंग करताना दिसत आहे.
![Tuzech Mi Geet Gaat Aahe: स्वराजला गुंडांच्या तावडीतून सोडवण्यासाठी मल्हार पोहोचला; 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेचा प्रोमो व्हायरल Tuzech Mi Geet Gaat Aahe marathi serial latest update Malhar arrives to rescue Swaraj from hooligan Tuzech Mi Geet Gaat Aahe: स्वराजला गुंडांच्या तावडीतून सोडवण्यासाठी मल्हार पोहोचला; 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेचा प्रोमो व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/05/083b5fa23ed4e33433e87721178186f31683270133670259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Tuzech Mi Geet Gaat Aahe: छोट्या पडद्यावरील तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) मालिकेत एक भावनिक वळण आलं आहे. मल्हार आणि मंजुळा हे समोरासमोर येणार आहे. मल्हारनं स्वराजला दिलेल्या माउथ ऑर्गनमध्ये मंजुळानं हिरे ठेवले आहेत. आता मंजुळा आणि स्वराजला काही गुंडांनी पकडले आहे. स्वराजला गुंडांच्या तावडीतून सोडवण्यासाठी मल्हार तिथे गेला आहे. तिथेच मल्हार आणि मंजुळाची भेट होणार आहे. सध्या तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये मल्हार हा गुंडांसोबत फायटिंग करताना दिसत आहे.
प्रोमोमध्ये दिसत आहे की, मंजुळा आणि स्वराजला काही गुंडांनी पकडले आहे. स्वराजला वाचवायला मल्हार तिथे आला आहे. अशातच मंजुळा आणि त्या गुंडांमध्ये झटापट होते. त्यामध्ये अचानक फायरिंग होते. ते पाहून स्वराज घाबरतो. स्वराज हा मल्हारला पाहिल्यांनंतर 'बाबा' अशी हाक मारतो.
गेली बरेच दिवस स्वराजला बोलता येत नाही. त्याच्या तोंडून बाबा हा शब्द ऐकून मंजुळा आश्चर्यचकित होते. त्यानंतर मल्हार आणि गुंडांमध्ये फायटिंग सुरु होते. आता मल्हार हा स्वराजला गुंडांपासून वाचवू शकेल का? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे.
पाहा प्रोमो
View this post on Instagram
सध्या 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील स्वराजला बोलता येत नाहीये. त्यामुळे मल्हारला त्याच्याबद्दल चिंता वाटत आहे. पण स्वराजनं 'बाबा' अशी हाक मारल्यानंतर मल्हार हा आश्चर्यचकित झाला आहे.
'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील कलाकार
मल्हार कामत ही भूमिका अभिनेता अभिजीत खांडकेकर हा साकारतो तर स्वरा उर्फ स्वराज ही भूमिका अवनी तायवाडे ही साकारते. तसेच या मालिकेमध्ये मोनिका मल्हार कामत ही भूमिका प्रिया मराठे ही साकारते आणि स्वराची आई म्हणजेच वैदेही मल्हार कामत ही भूमिका अभिनेत्री ऊर्मिला कानेटकर ही साकारते. मंजुळा हे भूमिका देखील ऊर्मिला साकारते. 'तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Tuzech Mi Geet Gaat Aahe: गुंडांनी स्वराजचं केलं अपहरण; मंजुळा, मल्हार स्वराजला वाचवायला जाणार?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)