Tuzech Mi Geet Gaat Aahe: मोनिकाचा स्वराज विषयीचा राग हजारो लोकांसमोर आला; 'तुझेच मी गीत गात आहे’ च्या प्रोमोनं वेधलं लक्ष
तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेच्या प्रोमोमध्ये मल्हार आणि स्वराज हे सोशल मीडियावरील लाईव्हच्या माध्यमातून नेटकऱ्यांसोबत संवाद साधताना दिसत आहेत.
Tuzech Mi Geet Gaat Aahe: तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेतील स्वराजच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. सध्या स्वराजचा आवाज परत आल्यानं मल्हार आनंदी झाला आहे, असं या मालिकेच्या गेल्या एपिसोडमध्ये दाखवण्यात आलं आहे. आता मल्हारनं सोशल मीडियावर एक लाईव्ह केलं आहे. या लाईव्हमध्ये तो लोकांना स्वराजबद्दल सांगताना दिसत आहे.
तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, मल्हार हा सोशल मीडियावर लाईव्ह सुरु करतो. या लाईव्हमध्ये तो विजयला स्वराजबद्दल बोलायला सांगतो. त्यानंतर मल्हार चैताली बोलायला सांगतो. चैताली ही स्वराजला स्पर्धेत सपोर्ट करण्याची विनंती नेटकऱ्यांना करते.
स्वराजला मल्हार हा लाईव्हमध्ये बोलायला सांगतो. स्वराज बोलत असतो, तेवढ्यात मोनिका येते. मोनिका स्वराजवर भडकते. ती म्हणते, ' तुझ्यामुळे पिहूचे सर्व फॅन्स तिला अनफॉलो करत आहेत. मल्हार हा तुझ्यामुळे त्याच्या मुलाला विसरला आहे. तुझा हा आलेला आवाज कसा परत घालवायचा, ते मला चांगलंच माहित आहे.'
मल्हार मोनिका सांगतो की, 'आम्ही लाईव्ह होते. तू जे बोलत आहेस ते हजारो, लाखो लोकांनी पाहिलं.' त्यानंतर क्षमा म्हणते, 'बरं झालं मोनिका तू हे बोललीस स्वराजचा तुझ्या मनातील राग लोकांसमोर आला.' आता मोनिका स्वराजची माफी मागेल का? हे तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या पुढील भागात समजेल.
पाहा प्रोमो:
View this post on Instagram
तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेत मल्हार कामत ही भूमिका अभिनेता अभिजीत खांडकेकर (Abhijeet Khandkekar) हा साकारतो तर स्वरा उर्फ स्वराज ही भूमिका अवनी तायवाडे ही साकारते. तसेच या मालिकेमध्ये मोनिका मल्हार कामत ही भूमिका प्रिया मराठे (Priya Marathe) ही साकारते आणि स्वराची आई म्हणजेच वैदेही मल्हार कामत ही भूमिका अभिनेत्री ऊर्मिला कानेटकर ही साकारते.
इतर महत्वाच्या बातम्या: