Marathi serial : भुवनेश्वरीचा प्लॅन यशस्वी, अधिपती-अक्षराच्या नात्यात दुरावा, सुर्यवंशींची सून घर सोडणार?
Marathi serial : भुवनेश्वरीमुळे अक्षरा आणि अधिपतीच्या नात्यात पुन्हा एकदा दुरावा निर्माण झाल्याचं पाहायला मिळणार आहे.
Marathi serial : चारुलता आणि भुवनेश्वरीचं सत्य समोर आल्यानंतर झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' (Tula Shikvin Changalach Dhada) ही मालिका पुन्हा एकदा रंजक वळणावर आली आहे. भुवनेश्वरीचं सत्य समोर आल्यानंतर अधिपतीचाही त्यामध्ये सहभाग होता, हे देखील अक्षराला कळलं आहे. त्यामुळे अक्षरा आणि अधिपतीच्या नात्यामध्ये आता दुरावा निर्माण झाल्याचं पाहायला मिळणार आहे.
भुवनेश्वरीमुळे अक्षरा घर सोडून जाण्याचाही निर्णय घेते. पण चारुहास आणि आज्जी तिला थांबवण्यासाठी प्रयत्न करतात. भुवनेश्वरी देखील अक्षराला घर सोडू देणार नाही असं म्हणते. पण हा तिचा नवा डाव तर नाही असा संशय पुन्हा निर्माण होतो. त्यातच अक्षराच्या या निर्णायामुळे अधिपतीलाही खूप त्रास होतो. त्यामुळे आता अक्षरा घर सोडून जाणार की नाही हे पाहणं रंजक ठरणार आहे.
अक्षरा घर सोडून जाणार?
मालिकेचा नुकताच नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये चारुहास आज्जीला म्हणतो की, काहीही झालं तरी अक्षरा घर सोडून जायला नको, नाहीतर संपेल सगळं.त्यावर भुनवेश्वरी चारुहासला म्हणते की, वेळ पडली तर आम्ही जाऊ पण त्यांनी नको जायला..त्यानंतर अक्षरा बॅग घेऊन हॉलमध्ये येते. तिच्या या निर्णयामुळे अधिपतीला देखील त्रास होत असल्याचं पाहायला मिळतंय. अक्षराच्या या निर्णयामुळे अधिपती आणि अक्षराचं नातं आता कोणतं नवं वळण घेणार याचीही उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
अक्षरा आईच्या बोलण्याचा करणार विचार?
दरम्यान अक्षरा तिच्या आईला घर सोडून येत असल्याचं सांगते. त्यावर तिची आई तिला म्हणते की, अक्षरा चूक की बरोबर यापेक्षा नवरा आणि संसार महत्त्वाच आहे ना..आपण थोडी पडती बाजू घेतली तर काही बिघडत नाही. त्याने काय होईल भांडण मिटेल... त्यावर अक्षरा पण तरीही आई मी येते असं म्हणते. त्यावर अक्षराची आई तिला सांगते की,ये तू अक्षरा कधीही ये, हे तुझंच घर आहे...पण माझं म्हणणं आहे की, भांडण करुन येऊ नकोस..जे काही गैरसमज असतील, भांडणं असतील ते मिटवून मग ये... त्यामुळे आईच्या बोलण्याचा विचार अक्षरा करणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
Sonalee Kulkarni : लाल मेहंदी, लाल बांगड्या, लालच बनारसी साडी अन अप्सरेच्या गालावर लाली!