एक्स्प्लोर
'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेचं दमदार शीर्षकगीत, आदर्श-उत्कर्षची लेखणी आणि भारदस्त आवाजाची जादू
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण आणि राजकारण याविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात. त्यांचं कार्य आजही तितकंच परिणामकारक आणि स्फूर्तिदायी ठरतं. महामानवाचे हेच विचार देशभरात पोहचवण्याच्या हेतूने 'स्टार प्रवाह'ने या मालिकेची निर्मिती केली आहे.
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेचं दमदार शीर्षकगीताचं मेकिंग समोर आलं आहे. 18 मे म्हणजेच बुद्ध पौर्णिमेपासून स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या मालिकेचं शीर्षकगीत आदर्श आणि उत्कर्ष शिंदे या जोडीने लिहिलं आहे. शिवाय या गाण्याला संगीतही त्यांनीच दिलं आहे. या गाण्याचे शब्द आदर्श आणि उत्कर्ष शिंदे या दोघांनी लिहिले आहेत. आदर्शच्या भारदस्त आवाजात नुकतंच या गाण्याचं रेकॉर्डिंग पार पडलं.
लहानपणापासूनच आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित झालेल्या या दोन्ही भावांकडे जेव्हा 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या मालिकेच्या शीर्षकगीतासाठी विचारणा झाली तेव्हा दोघांनीही या गाण्यासाठी स्वत:ला झोकून दिलं. महामानवाचे विचार शीर्षकगीतातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं आव्हानात्मक होतं. आदर्श आणि उत्कर्षने या गाण्यावर बराच अभ्यास आणि वाचन करुन शब्द लिहिले. मालिकेचं टायटल ट्रॅक लिहिण्याची दोघांचीही ही पहिलीचं वेळ आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील मालिकेत 'हा' अभिनेता मुख्य भूमिकेत
या नव्या अनुभवाविषयी सांगताना आदर्श शिंदे म्हणाला, "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर मालिका येणं आणि त्याचं शीर्षकगीत करण्याची संधी मिळणं हा माझ्यासाठी अतिशय आनंददायी प्रवास आहे. स्टार प्रवाहने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे आभार. या शीर्षकगीतातून बाबासाहेबांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि हे गाणं सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवेल याची मला खात्री आहे."
शीर्षकगीताचे शब्द
‘क्रांतिसूर्य तू - शिल्पकार तू भारताचा, बोधिसत्व मूकनायका
मोडल्या रुढी - त्या परंपरा- दिव्यतेजा, तूच सकल न्याय दायका
जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझिच गर्जना
भीमराया माझा भीमराया, आला उद्धाराया माझा भीमराया
भारताचा पाया माझा भीमराया’…..
18 मे पासून म्हणजेच बुद्ध पौर्णिमेपासून सुरु होणाऱ्या या मालिकेत सागर देशमुख डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणार आहे. या मालिकेतून महामानवाचा बालपणापासूनचा प्रवास पाहायला मिळेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण
भारत
Advertisement