Taarak Mehta ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील 'या' कलाकाराला झाली कोरोनाची लागण
Taarak Mehta ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील बाघाला कोरोनाची लागण झाली आहे.
Tanmay Vekaria Covid Postive : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनबाधितांमध्येही वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांत बॉलिवूड मनोरंजन सृष्टीतील अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. मोठ्या पडद्यापासून छोट्या पडद्यापर्यंत अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली असून आता तारक मेहता का उल्टा चष्माच्या सेटवरही कोरोना पोहोचला आहे. मालिकेतील एका महत्त्वाच्या कलाकाराला कोरोनाची लागण झाली असून त्याने स्वतः याबाबत माहिती दिली आहे. हा दुसरा कोणी नसून तन्मय वेकारिया आहे जो मालिकेत बाघाची भूमिका साकारत आहे.
बाघाची भूमिका साकारणाऱ्या तन्मय वेकारियाने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे. त्याने लिहिले आहे,"सर्व गोष्टींची काळजी घेतल्यानंतरही माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. म्हणूनच माझी विनंती आहे की जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी त्यांची चाचणी करून घ्यावी. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा".
View this post on Instagram
2020 मध्येही झाली होती कोरोनाची लागण
मार्च 2020 मध्येही अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी एक तन्मय वेकारिया. त्यामुळे तन्मयला कोरोनाची लागण होण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो या कार्यक्रमात बाघा ही लोकप्रिय व्यक्तिरेखा साकारत आहे. तन्मयला कोरोनाची लागण झाल्याने सेटवरील प्रत्येक व्यक्तीची चाचणी केली जाणार आहे.
संबंधित बातम्या
Bhool Bhulaiyaa 2 : Vidya Balan चे कमबॅक, 'भूल भुलैया 2' मध्ये साकारणार मंजुलिकाची भूमिका
Hrithik Roshan : ठरलं! ऋतिक रोशन 'विक्रम वेधा'चा खलनायक, 'या' दिवशी होणार पहिला लूक प्रदर्शित
Allu Arjun on Pushpa -The Rule : अल्लू अर्जुनने केला खुलासा, 'या' दिवशी सुरू होणार 'पुष्पा 2' चे चित्रीकरण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha























