Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' च्या टीमनं 'इंडियाज बेस्ट डान्सर'मध्ये लावली हजेरी; केदार शिंदे म्हणतात,'मराठी सिनेमा जेव्हा त्यांच्या व्यासपीठावर जावून...'
'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या चित्रपटाच्या टीमनं इंडियाज बेस्ट डान्सर या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली.
![Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' च्या टीमनं 'इंडियाज बेस्ट डान्सर'मध्ये लावली हजेरी; केदार शिंदे म्हणतात,'मराठी सिनेमा जेव्हा त्यांच्या व्यासपीठावर जावून...' The team of Baipan Bhari Deva movie in India's Best Dancer show see photos Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' च्या टीमनं 'इंडियाज बेस्ट डान्सर'मध्ये लावली हजेरी; केदार शिंदे म्हणतात,'मराठी सिनेमा जेव्हा त्यांच्या व्यासपीठावर जावून...'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/20/13011ed46111371afa007f1cbf4d84471692512214957259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी केले आहे. 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाच्या टीमनं इंडियाज बेस्ट डान्सर या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमामध्ये 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाच्या कलाकारांनी डान्स देखील केला.
नुकतीच केदार शिंदे यांनी इंडियाज बेस्ट डान्सर या कार्यक्रमाच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला त्यांनी खास कॅप्शन देखील दिलं आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, काल इंडियाज बेस्ट डान्सर या कार्यक्रमात 'बाईपण भारी देवा' टीमला खास निमंत्रित केलं होतं. फारच अभिमान वाटतो. मराठी सिनेमा जेव्हा त्यांच्या व्यासपीठावर जावून आपला डंका वाजवतो तेव्हा ऊर भरून येतो. मला वाटतं याआधी सैराट या सिनेमाच्या टीमला कपिल शर्मा शो साठी बोलवलं गेलं होतं. आपल्या मराठी कार्यक्रमात हिंदी कलाकारांचे प्रमोशन आपण करतो मात्र हे आपल्या बाबतीत हिंदीत फार होताना दिसत नाही. याचं शल्य मनात नक्कीच आहे. 'बाईपण भारी देवा' चं संपुर्ण यश हे तुम्हा मायबाप प्रेक्षकांचं आहे. आम्ही फक्त तुमचे प्रतिनिधी आहोत.'
View this post on Instagram
केदार शिंदे यांनी इंडियाज बेस्ट डान्सर या कार्यक्रमाचा प्रोमो देखील शेअर केला आहे. या प्रोमोला त्यांनी कॅप्शन दिलं, 'बाईपण भारी देवाच्या कलाकारांची India’s Best Dancer च्या स्टेजवर स्पर्धकांसोबत फुल्ल धमाल.'
View this post on Instagram
बाईपण भारी देवा या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), वंदना गुप्ते (Vandana Gupte), सुकन्या मोने (Sukanya Mone), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar) आणि दीपा परब (Deepa Parab) या अभिनेत्रींनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Baipan Bhaari Deva: 'सहा लक्ष्मींच्या पावलाने चित्रपटगृहात...'; केदार शिंदे यांची खास पोस्ट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)