एक्स्प्लोर

Comedian Parag Kansara dies : विनोदाच्या जगतातील आणखी एक तारा निखळला; कॉमेडियन पराग कंसारा यांचे निधन

Comedian Parag Kansara: ‘लाफ्टर चॅलेंज’मध्ये झळकलेल्या कॉमेडियन पराग कंसारा (Comedian Parag Kansara) यांचेही आकस्मिक निधन झाले आहे.

Comedian Parag Kansara : टीव्ही विश्वातील लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. या धक्क्यातून लोक सावरलेही नाहीत, तर आता ‘लाफ्टर चॅलेंज’मध्ये झळकलेल्या कॉमेडियन पराग कंसारा (Comedian Parag Kansara) यांचेही आकस्मिक निधन झाले आहे. पराग कंसारा यांच्या निधनानंतर संपूर्ण कॉमेडीविश्व पुन्हा एकदा शोकसागरात बुडाले आहे. कॉमेडियन सुनील पाल यांनी पराग यांच्या निधनाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

कॉमेडियन-अभिनेते सुनील पाल यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करून पराग यांच्या मृत्यूची दुःखद बातमी दिली आहे. व्हिडीओमध्ये ते म्हणाले की, कॉमेडीच्या दुनियेतून आणखी एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. आमच्या लाफ्टर चॅलेंजचे सहावे पार्टनर पराग कंसाराजी आता या जगात नाहीत. प्रत्येक गोष्टीचा उलट विचार करून, ते आम्हाला खूप हसवायचे. पण, पराग भाई आता या जगात नाहीत. हे काय सुरु आहे?’

पाहा व्हिडीओ :

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sunil Pal Comedian (@sunilpalcomedian)

आपल्या या व्हिडीओमध्ये सुनील म्हणाले की, कॉमेडीच्या या जगातला कुणाची नजर लागलीये हे कळत नाही. सगळ्यांना हसवणार्‍यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची अशी स्थिती का होत आहे. एकापेक्षा एक विनोदी कलाकार आपल्यापासून दूर जात आहेत. काही दिवसांपूर्वी आपण राजू श्रीवास्तव यांना अखेरचा निरोप दिला. त्याचा धक्का अजूनही आहे. अजूनही आमचा त्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. त्यांच्या आधी भाबीजी घर पर हैं या मालिकेतील दिपेश भानने लहान वयात चाहत्यांना अलविदा म्हटले. चार दिवसांपूर्वीच माझा चांगला मित्र आणि कॉमेडियन जितू गुप्ता यांच्या मुलाचे निधन झाले. काही दिवसांपूर्वी हास्यकवी अशोक सुंदराणी यांचे निधन झाले, अनंत श्रीजी यांचेही निधन झाले आणि आता पराग कंसारा.

पराग कंसारा यांची ओळख

कॉमेडियन पराग कंसारा (Parag Kansara) हे गुजरातमधील वडोदरा येथील रहिवासी होते. त्यांनी 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या लोकप्रिय कॉमेडी शोच्या पहिल्या सीझनमध्ये सहभाग घेतला होता. या शोमधून ते घराघरांत लोकप्रिय झाले होते. त्यांची कॉमेडी चाहत्यांना आणि प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. मात्र, ते या शोचे विजेतेपद पटकावू शकले नाहीत. या शोनंतरही पराग कंसारा यांनी अनेक कॉमेडी शोमध्ये काम केले होते. परागचे शो फक्त टीव्हीवरच नाही, तर इतर ठिकाणीही पसंत केले गेले होते.

हेही वाचा :

Entertainment News Live Updates 6 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

महत्त्वाच्या बातम्या

Marathi famous Actor Sangram: 'माझा साखरपुडा मोडला अन्...' प्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळनं सांगितला 'तो' किस्सा, घरी न थांबता शुटिंगला गेला होता, कारण?
'माझा साखरपुडा मोडला अन्...' प्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळनं सांगितला 'तो' किस्सा, घरी न थांबता शुटिंगला गेला होता, कारण?
TV Actress Palak Purswani: बिग बॉस फेम अन् प्रसिद्ध अभिनेत्रीने बांधली साताजन्माची गाठ, पलकचा नवरा आहे तरी कोण? महादेवाच्या मूर्तिसमोर केलं लग्न
बिग बॉस फेम अन् प्रसिद्ध अभिनेत्रीने बांधली साताजन्माची गाठ, पलकचा नवरा आहे तरी कोण? महादेवाच्या मूर्तिसमोर केलं लग्न
Ram Kapoor in lock up 2: 'ब्लँकेटच्या आत त्याने मला...' बोर्डिंग स्कूलमध्ये राम कपूरसोबत नेमकं काय घडलं? 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
'ब्लँकेटच्या आत त्याने मला...' बोर्डिंग स्कूलमध्ये राम कपूरसोबत नेमकं काय घडलं? 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
Khalid Ka Shivaji Marathi Movie: वादाच्या भोवऱ्यात अडकलेला सिनेमा 'खालिद के शिवाजी'आता ओटीटीवर; कुठे पाहायला मिळणार?
वादाच्या भोवऱ्यात अडकलेला सिनेमा 'खालिद के शिवाजी'आता ओटीटीवर; कुठे पाहायला मिळणार?

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Inflation : देशामध्ये महागाईचा भडका, आरबीआयची नियंत्रण रेषा ओलांडली, कर्जाचा EMI वाढणार? आरबीआयच्या बैठकीकडे लक्ष
देशामध्ये महागाईचा भडका, आरबीआयची नियंत्रण रेषा ओलांडली, कर्जाचा EMI वाढणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
MLWF : जून महिन्याच्या पगारात 25  रुपयांची कपात, जूनच्या पगारातून कपात झालेली रक्कम कुठे जमा होते? नेमके काय फायदे मिळतात?
जूनच्या पगारातून कपात झालेले 25 रुपये कुठे जमा होतात? नेमके काय फायदे मिळतात?
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
IND vs ENG : बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, पहिल्या वनडेत टीम इंडियाची दमदार कामगिरी
बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, टीम इंडियाची दमदार कामगिरी
Embed widget