![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Marathi Serial : महाराष्ट्राची लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग'; टीआरपीच्या शर्यतीत काही केल्या पहिला क्रमांक हटेना
Marathi Serial : 'ठरलं तर मग' या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत बाजी मारली आहे.
![Marathi Serial : महाराष्ट्राची लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग'; टीआरपीच्या शर्यतीत काही केल्या पहिला क्रमांक हटेना Tharala Tar Mag marathi serials entertainment television Marathi Serial TRP Rating Tharala Tar Mag Aai Kuthe Kay Karte Sukh Mhanje Nakii Ky Asta Rang Maza Vegla Marathi Serial : महाराष्ट्राची लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग'; टीआरपीच्या शर्यतीत काही केल्या पहिला क्रमांक हटेना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/19/f2d0613d27fbad7a3298f80ec3724e471692422330731254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Marathi Serial TRP Rating : मराठी मालिका (Marathi Serials) विश्वात वेगवेगळे प्रयोग होत आहेत. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या...
1. टीआरपीच्या शर्यतीत 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.8 रेटिंग मिळाले आहे.
2. 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहे.
3. टीआरपी लिस्टमध्ये 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakii Ky Asta) ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.4 रेटिंग मिळाले आहे.
4. 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) ही मालिका टीआरपी रिपोर्टनुसार चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.4 रेटिंग मिळाले आहे.
5. 'तुझेच मी गीत गात आहे' (Tuzech Mi Geet Gaat Aahe) ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पाचव्या स्थानावर आहे. टीआरपी रिपोर्टनुसार या मालिकेला 5.9 रेटिंग मिळाले आहे.
6. 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका सहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.7 रेटिंग मिळाले आहे.
7. टीआरपीच्या शर्यतीत 'कुन्या गावाची गं तू रानी' ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.5 रेटिंग मिळाले आहे.
8. 'मन धागा धागा जोडते नवा' ही मालिका टीआरपी रिपोर्टमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.0 रेटिंग मिळाले आहे.
9. नव्या स्थानावर 'अबोली' ही मालिका आहे. या मालिकेला 4.0 रेटिंग मिळाले आहे.
10. 'मुरांबा' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 3.9 रेटिंग मिळाले आहे.
मालिकांच्या महाएपिसोडला सर्वाधिक रेटिंग
'रंग माझा वेगळा' या मालिकेच्या महाएपिसोडला सर्वाधिक रेटिंग मिळाले आहे. या मालिकेच्या महाएपिसोडला 5.0 रेटिंग मिळाले आहे. तर शुभविवाह मालिकेच्या महाएपिसोडला 3.4 रेटिंग मिळाले आहे. तर 'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रम टीआरपीच्या शर्यतीत मागे पडला आहे. या कार्यक्रमाला फक्त 0.7 रेटिंग मिळाले आहे. 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमालाही 0.6 रेटिंग मिळाले आहे. गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटिला आल्या असून या मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहेत.
संबंधित बातम्या
Srimad Ramayan: ‘श्रीमद् रामायण’ मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीस; प्रोमो पाहिलात?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)