एक्स्प्लोर

Telly Masala : प्रसिद्ध गायकाच्या घराबाहेर गोळीबार ते बिग बॉस मराठीच्या घरात निक्कीची मनमानी; मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या जाणून घ्या

Telly Masala : मनोरंजनसृष्टीत आज दिवसभरात घडलेल्या बातम्यांबद्दल जाणून घ्या...

Telly Masala : मालिका आणि सिनेविश्वात दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत असतात. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) तसेच ओटीटीवर विविध वेब सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Salman Khan Firing Case : बिष्णोई गँगच्या म्होरक्यांना तुरुंगात दाऊद गँगची भीती, सलमान खान गोळीबार प्रकरणात दोघे अटकेत

Salman Khan  Firing Case : बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांच्या घरावर गोळीबार करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई गँगचे सदस्य सध्या तळोजा कारागृहात आहेत. याच कारागृहात अंडरवल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या टोळीचे सदस्यही असून दाऊद टोळीच्या सदस्यांकडून बिष्णोई गँगच्या सदस्यांना धमकावलं जात असल्याचे समोर आलं आहे. तसं पत्रच बिष्णोई गँगच्या अटकेत असलेले सदस्यांच्या कुटुंबियांनी गृहविभागाचे मुख्य सचिवांना लिहिलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

"कुतें की मौत मरोगे...", प्रसिद्ध गायकाच्या घराबाहेर गोळीबार, सलमान खानसोबत कनेक्शन; नेमकं प्रकरण काय?

AP Dhillon House Firing : प्रसिद्ध गायक एपी ढिल्लनच्या घराबाहेर गोळीबार झाल्याच्या घटनेनं एकच खळबळ माजली आहे. एपी ढिल्लनच्या कॅनडातील घराबाहेर गोळीबाराची घटना घडली आहे. कॅनडातील व्हँकुव्हरमध्ये एपी ढिल्लन याच्या घरावर गोळीबार झाल्याची माहिती आहे. ही घटना रविवारी 1 ऑगस्ट रोजी घडली असून याचा सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराशी संबंध असल्याचं समोर आलं आहे. सलमानच्या घराबाहेर गोळीबार केलेल्या लॉरेन्स बिश्नोई गँगनेच एपीच्या घराबाहेर गोळीबार केल्याचं समोर आलं आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Anita Hassanandani : प्रेमासाठी करिअरवर सोडलं पाणी, बॉयफ्रेंडकडून मिळाला धोका; अभिनेत्रीला आता होतोय पश्चात्ताप

Anita Hassanandani Struggle Story : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अनिता हसनंदानी हिने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. काही काळ छोट्या पडद्यापासून दूर असलेली अनिता हसनंदानी आता 'सुमन इंदोरी' या नवीन मालिकेतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आहे. एका मुलाखतीत अनिताने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल सविस्तर चर्चा केली आहे. अनिताने तिचे पूर्वीचे रिलेशनशिप्स आणि इंडस्ट्रीमधील संघर्षाबद्दल खुलासा केला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Bigg Boss Marathi Season 5 : कॅप्टनचे आदेश धुडकावले, भर दिवसा झोपली; 'बिग बॉस'च्या घरात निक्कीची मनमानी, घरातील मंडळी हैराण

Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli : 'बिग बॉस मराठी'च्या यंदाचा सीझन (Bigg Boss Marathi New Season) आता रंगू लागला आहे.  बिग बॉसच्या घरातील सहावा आठवडा सुरू झाला असून आठवड्यागणिक समीकरणे बदलताना दिसत आहेत. घरातील मैत्रीच्या नात्याची व्याख्याही बदलत आहेत. वीकेंडला झालेल्या भाऊच्या धक्क्यावर होस्ट रितेश देशमुखने निक्की तांबोळीचे (Nikki Tamboli) कौतुक केले होते. मात्र,  आता हीच निक्की बिग बॉसच्या घरातील नियमांची पायमल्ली करताना दिसणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

OTT Crime Thriller Web Series : 'मिर्झापूर 4' ते 'आश्रम'चा नवीन सीझन; ओटीटीवर येणार आहेत 'या' क्राईम थ्रिलर वेब सीरिज

OTT Crime Thriller Web Series :  काही वेब सीरिजना लोकांनी तुफान प्रतिसाद दिला. या वेब सीरिजची पुढील सीझनची उत्सुकता लोकांमध्ये दिसून आली. मिर्झापूर या क्राइम थ्रिलर वेब सीरिजनेही अशीच उत्सुकता निर्माण केली होती. या वेब सीरिजचे तीन सीझन रिलीज झाले असून चौथ्या सीझनची उत्सुकता आहे. अजूनही काही वेब सीरिजचे पुढील सीझन येणार आहेत. हे नवीन सीझन नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, डिस्ने प्लस हॉटस्टार आणि जिओ सिनेमावर येणार आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

DA Hike : महागाई भत्ता 2 टक्के वाढला, 50000 मूळ वेतन असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा पगार किती रुपयांनी वाढणार?
केंद्रानं महागाई भत्ता 2 टक्के वाढवला,50000 मूळ वेतन असलेल्यांचा पगार कितीनं वाढणार?
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2025 | शुक्रवार
बंगळुरू ते सातारा... औषध पिऊन रोडवर बसला, मदतीसाठी एकाने रुग्णालयात नेला अन् राकेश पोलिसांना सापडला
बंगळुरू ते सातारा... औषध पिऊन रोडवर बसला, मदतीसाठी एकाने रुग्णालयात नेला अन् राकेश पोलिसांना सापडला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP Majha : 28 March 2025Kunal Kamra Update : येत्या ३१ मार्च रोजी कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर हजर राहणारABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 28 March 2025Disha Salian Case News : दिशा सालियन प्रकरणावरुन राजकीय घमासान, सत्ताधारी आणि विरोधक काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
DA Hike : महागाई भत्ता 2 टक्के वाढला, 50000 मूळ वेतन असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा पगार किती रुपयांनी वाढणार?
केंद्रानं महागाई भत्ता 2 टक्के वाढवला,50000 मूळ वेतन असलेल्यांचा पगार कितीनं वाढणार?
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2025 | शुक्रवार
बंगळुरू ते सातारा... औषध पिऊन रोडवर बसला, मदतीसाठी एकाने रुग्णालयात नेला अन् राकेश पोलिसांना सापडला
बंगळुरू ते सातारा... औषध पिऊन रोडवर बसला, मदतीसाठी एकाने रुग्णालयात नेला अन् राकेश पोलिसांना सापडला
Namo Shetkari : मोठी बातमी :  शेतकऱ्यांचा गुढीपाडवा जोरात, उद्यापासून नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये खात्यात येणार!
Namo Shetkari : मोठी बातमी : शेतकऱ्यांचा गुढीपाडवा जोरात, उद्यापासून नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये खात्यात येणार!
बाॅयफ्रेंडशी का बोलू देत नाहीस? नवऱ्याने रात्री कामावरून घरी येताच काॅफी मागितली अन् संतापलेल्या बायकोनं सासूला ओपन चॅलेंज देत..
बाॅयफ्रेंडशी का बोलू देत नाहीस? नवऱ्याने रात्री कामावरून घरी येताच काॅफी मागितली अन् संतापलेल्या बायकोनं सासूला ओपन चॅलेंज देत..
मूळचा धनंजय मुंडेंचा माणूस, वाल्मिकशी काय नातं; मारहाणीवेळी संतोष देशमुखांनी नाव घेतलेला सुग्रीव कराड कोण?
मूळचा धनंजय मुंडेंचा माणूस, वाल्मिकशी काय नातं; मारहाणीवेळी संतोष देशमुखांनी नाव घेतलेला सुग्रीव कराड कोण?
Kumbh Mela 2027 : मोठी बातमी : त्र्यंबकमध्ये गोदावरी मोकळा श्वास घेणार, कुशावर्तासारखे पवित्र कुंड तयार करणार; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची घोषणा
त्र्यंबकमध्ये गोदावरी मोकळा श्वास घेणार, कुशावर्तासारखे पवित्र कुंड तयार करणार; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची घोषणा
Embed widget