एक्स्प्लोर
Advertisement
तेजश्री प्रधान पुन्हा सूनबाईच्या भूमिकेत, सासूची व्यक्तिरेखा कोण साकारणार?
'तुला पाहते रे'नंतर झी मराठी वाहिनीवर अगंबाई सासूबाई ही नवी मालिका येत आहे. यामध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधान मुख्य भूमिकेत दिसणार आहे
मुंबई : 'झी मराठी' वाहिनीवरील 'तुला पाहते रे' मालिका संपण्याची घोषणा झाली. शेवटचा एपिसोडही शूट झाला. मालिकेच्या टीमने सेलिब्रेशनही केलं. पण साडेआठच्या हॉट स्लॉटवर कोणती मालिका येणार? हा प्रश्न सर्वांना पडला आहे.
'काहीही हं श्री' म्हणत प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत झालेली अभिनेत्री तेजश्री प्रधान झी मराठीवर पुनरागमन करणार असल्याची माहिती आहे. तेजश्रीच्या बाबतीत 'ती सध्या काय करते' हा प्रश्न पडलेल्या चाहत्यांना उत्तर मिळालं आहे.
खरं तर रात्री साडेआठ स्लॉट खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण याचवेळी 'स्टार प्रवाह'वर 'जिवलगा', 'सोनी मराठी'वर 'कोण होणार करोडपती', 'कलर्स मराठी'वर 'घाडगे अँड सून', तर 'झी युवा'वर 'फुलपाखरु' या मालिका लागतात. 'बार्क'वरचा आपला नंबर जाऊ नये म्हणून झी मराठी तितकीच तोडीची मालिका आणणार हे उघड आहे.
'तुला पाहते रे'नंतर या चॅनलवर येणारी नवी मालिका आहे अगंबाई सासूबाई. काही दिवसांपूर्वी तेजश्रीनं ट्वीट केलं होतं. तुम्हाला मी कोणत्या माध्यमात जास्त आवडते? त्याचं उत्तर इथे दडलं आहे.
तेजश्री प्रधान 2013 मध्ये 'होणार सून मी या घरची' मालिकेत झळकली होती. दरम्यानच्या काळात तिने 'लग्न पहावं करुन', 'ती सध्या काय करते', 'असेही एकदा व्हावे' यासारखे चित्रपट केले. तर सूर नवा ध्यास नवा या संगीत रिअॅलिटी शोच्या पहिल्या पर्वाचं सूत्रसंचालन तिने केलं होतं. सध्या ती 'तिला काही सांगायचंय..' नाटकात आहे. आता ती पुन्हा एकदा मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
अगंबाई सासूबाईमध्ये तेजश्री सूनबाई असेल हे तर उघड आहे. मराठी सिनेविश्वातला एकेकाळचा ग्लॅमरस चेहरा सासूच्या भूमिकेत आहे. त्या म्हणजे निवेदिता सराफ. निवेदिता सराफ यांनी सेकंड इनिंगमध्ये टेलिव्हिजनकडे मोर्चा वळवला आहे. गेल्याच वर्षी त्या 'दुहेरी' मालिकेत सासूच्या भूमिकेत होत्या. आता सासू-सूनेचं नातं नव्या मालिकेतून पाहायला प्रेक्षक उत्सुक असतील, यात शंका नाही
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
फॅक्ट चेक
Advertisement