एक्स्प्लोर
'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या निर्मात्यांकडून नव्या दयाबेनचा शोध सुरु
दिशा वकानी सब टीव्हीवरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधून सप्टेंबर 2017 पासून गायब आहे. तिने नोव्हेंबर 2017मध्ये मुलीला जन्म दिला होता. तेव्हापासून ती मॅटर्निटी लीव्हवर आहे.
मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)दयाबेन अर्थात दिशा वकानीला बदलण्याची अटकळ बांधली जात होती. आता मालिकेच्या निर्मात्यांनी नव्या दयाबेनचा शोधही सुरु केला आहे. मुलगी लहान असल्यामुळे दिशाला शूटिंगसाठी वेळ मिळत नाही. पण कोणताही कलाकार हा मालिकेपेक्षा मोठा नसतो, असं सांगत निर्माते असित मोदी यांनी नव्या दयाबेनसाठी ऑडिशन सुरु केल्याचंही सांगितलं.
दिशा वकानी सब टीव्हीवरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधून सप्टेंबर 2017 पासून गायब आहे. तिने नोव्हेंबर 2017मध्ये मुलीला जन्म दिला होता. तेव्हापासून ती मॅटर्निटी लीव्हवर आहे. मालिकेत परतण्याबाबत तिच्याकडून कोणतीच माहिती समोर आलेली नाही. परंतु आता आणखी वाट पाहण्याची निर्मात्यांची इच्छा नाही. "आम्हाला नव्या दयाबेनचा शोध सुरु करावाच लागेल. कोणीही मालिकेपेक्षा मोठा नाही. तारक मेहता का उल्टा चश्मा नव्या चेहऱ्यासोबत पुढे जाणार आहे, कारण कुटुंब दयाबेनशिवाय अपूर्ण आहे," असं असित मोदी म्हणाले.
मोदी पुढे म्हणाले की, आमच्या टीमने दिशाची फार वाट पाहिली. देशातील कामावर जाणाऱ्या बऱ्याच गर्भवती महिला मॅटर्निटी लीव्हवर जातात. बाळाला जन्म देतात आणि पुन्हा नोकरीवर रुजू होतात. सध्याच्या महिला बाळाच्या जन्मानंतरही काम सुरु ठेवतात. आम्ही दिशाला सुट्टी दिली आहे, पण आम्ही आता फार वाट पाहू शकत नाही."
एखाद्या अभिनेत्रीला एकाच रात्री बदलता येत नाही. आधीपासून ट्रॅक तयार करावा लागतो. आम्ही आता दयाबेनच्या व्यक्तिरेखेसाठी ऑडिशनची सुरुवात केली आहे. भविष्यात काय होणार हे माहित नाही. पण शो पुढे सरकायला हवा, हे मी पुन्हा सांगतो, असं असित मोदींनी स्पष्ट केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement