Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील अभिनेत्रीनं असित मोदी यांच्यावर केला लैंगिक छळाचा आरोप; प्रॉडक्शन हेडने आरोप फेटाळले
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेत रोशन सिंह सोढी ही भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बंसीवालानं असित मोदी आणि इतर दोन व्यक्तींवर गंभीर आरोप केले आहेत.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या छोट्या पडद्यावर प्रसिद्ध मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. गेली कित्येक वर्ष ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आता या मालिकेचे निर्माते असित मोदी (Asit Modi) हे सध्या चर्चेत आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत रोशन सिंह सोढी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसीवालनं (Jennifer Mistry Bansiwal) असित मोदी आणि मालिकेच्या टीममधील इतर दोन व्यक्तींवर गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसीवालनं असित मोदी, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचे प्रोजेक्ट हेड सोहिल रमानी आणि एग्झीक्युटिव्ह प्रोड्यूसर जतिन बजाज यांच्यावर लैंगिक छळाचा (Sexual harassment) आरोप केला आहे.
एका रिपोर्टनुसार, जेनिफरने असित मोदीवर केवळ लैंगिक छळाचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. असित मोदींशिवाय जेनिफरने प्रोजेक्ट हेड सोहिल रमाणी आणि कार्यकारी निर्माते जतिन बजाज यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. रिपोर्ट्सनुसार, जेनिफर ही गेल्या 2 महिन्यांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचे शूटिंग करत नव्हती. तिनं 6 मार्च पर्यंत शूटिंग केले.
एका मुलाखतीमध्ये जेनिफरनं ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो सोडण्याबाबत सांगितलं, 'होय, मी शो सोडला आहे. मी माझा शेवटचा एपिसोड 6 मार्च रोजी शूट केला. सोहिल आणि जतीन यांच्याकडून माझा अपमान झाल्यामुळे मला शो सोडावा लागला.'
पुढे जेनिफरनं सांगितलं,'मी त्यांना सांगितले की मी 15 वर्षे काम केले आहे आणि तुम्ही मला जबरदस्तीने थांबवू शकत नाही. मी निघताना सोहिल मला धमकावत होता. मी असित मोदी, सोहिल रमानी आणि जतिन बजाज यांच्याविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे.'
काय म्हणाले प्रोडक्शन हेड?
एका रिपोर्टनुसार, असित मोदींना जेनिफरच्या आरोपांबद्दल विचारण्यात आले तेव्हा निर्मात्याने सांगितले की, ते सध्या मंदिरात आहे आणि ते नंतर बोलतील. तर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे प्रोडक्शन हेड सोहिल रमानी यांनी जेनिफर मिस्त्री बंसीवालानं केलेले आरोप फेटाळले आहेत. ते म्हणले, 'ही फक्त पब्लिसिटी आहे. असा छळ होत असेल तर तिनं आधी ऑथोरिटीजकडे जायला पाहिजे होते. आमच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये महिलांशी संबंधित सर्व समस्यांसाठी एक समिती आहे आणि ती तिथेही महिला तक्रार करू शकतात. आम्ही सर्व आरोपांना कायदेशीर पद्धतीने उत्तर देऊ. हा केवळ आमची, आमच्या शोची आणि आमच्या प्रॉडक्शन हाऊसची बदनामी करण्याचा डाव आहे.'
इतर महत्त्वाच्या बातम्या: