(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jahnavi Killekar : 'तिच्या "त्या" विधानाचा राग येण्यापेक्षा मला किव आली...',पॅडीच्या करिअरवर बोलल्यानंतर जान्हवीवर मराठी अभिनेत्याचा राग
Jahnavi Killekar : मराठी अभिनेत्याने जान्हवी जे पॅडीला बोलली त्यावर रोष व्यक्त केला असल्याचं पाहायला मिळतंय.
Jahnavi Killekar : बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi new season) सध्या काही जणांकडून वारंवार वैयक्तिक टीका होत असल्याचं पाहायला मिळत आहे. निक्की (Nikki Tamboli) आणि जान्हवीच्या (Jahnavi Killekar) यांच्या बोलण्यावरुन रितेशनेही (Ritiesh Deshmukh) त्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. इतकच नव्हे तर जान्हवीची भाऊच्या धक्क्यावरुन हकालपट्टी करत एका आठवड्यासाठी तिला जेलमध्ये राहण्याची शिक्षा दिली. पण जान्हवीने पॅडी बोलताना जी भाषा वापरली त्यावर मराठी सिनेसृष्टीतूनही बराच रोष व्यक्त करण्यात आला.
अभिनेता सुशील इनामदार याने नुकतीच अल्ट्रा मीडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये जान्हवीने केलेल्या वक्तव्यावर भाष्य केलंय. त्याचप्रमाणे तिने ज्याप्रकारे पॅडीच्या करिअरवर भाष्य केलं त्याचप्रमाणे सुशीलने तिच्याही करिअरवर भाष्य केल्याचं पाहायला मिळतंय. बाहेर ओव्हरअॅक्टिंग केली आणि आता इथेही ओव्हरअॅक्टिंग करत असल्याचं जान्हवीने म्हटलं होतं.
'स्वत:ला अभिनयातला 'अ' देखील माहित नसाताना...'
जान्हवीच्या वक्तव्यावर बोलताना सुशीलने म्हटलं की, 'आता मी फक्त पॅडीमुळे बिग बॉस पाहतोय. एका भागामध्ये अभिनेत्री (प्रश्नचिन्ह) ज्या आहेत जान्हवी किल्लेकर हिने ज्या पद्धतीने पॅडीविषयी हजारो कॅमेऱ्यांसमोर जे वक्तव्य केलं ते फारच हास्यास्पद होतं. त्याचा मला राग येण्यापेक्षा मला तिच्या त्या विधानाचा किव आली. स्वत:ला अभिनयातला 'अ' देखील माहित नसाताना आपल्या सहकलाकाराला गरजेचं नाही तुम्ही त्याच्यासोबत काम केलं आहे की नाही, तेही इतक्या कॅमेऱ्यासमोर हे फार वाईट आहे. तुम्हाला त्या कर्तृत्वही माहित नाही, त्याने या क्षेत्रासाठी काय गोष्टी केल्या आहेत, किती स्ट्रगल केलाय हेही तुम्हाला अभिनेत्री म्हणून माहित नसेल तर आपण त्याच्या अभिनय क्षमतेविषयी बोलू नये.'
'मला आता या विषयावर बोलायची इच्छाही नाही. कारण आता या विषयावर बोलून मला ती लोकं आता मोठी करायची नाहीत. आपल्याला कितीही राग आला तरी आपल्या समोर नट म्हणून आणि वयानेही मोठी असलेली व्यक्ती आहे, तर बोलताना जरा भान ठेवायला हवं', असं म्हणत जान्हवीवरचा राग सुशील इनामदारने व्यक्त केला आहे.