एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : भाऊचे पॉईंट्स भारी, भाऊची होस्टिंग भारी, च्यामायला भाऊच एकदम लयभारी; रितेश देशमुखचं बिग बॉस प्रेमींकडून कौतुक

Bigg Boss Marathi Host Riteish Deshmukh : बिग बॉस मराठीचा नवा होस्ट रितेश देशमुखचं नेटकऱ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे.

Bigg Boss Marathi New Season : बिग बॉस मराठी यंदाच्या सीझनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी महाराष्ट्राचा लाडका भाऊ रितेश देशमुख याच्या खांद्यावर आहे. बिग बॉस प्रेमी रितेश देशमुखला नव्या अवतारात पाहून खूप खूश आहेत. बिग बॉस मराठी भाऊच्या धक्क्यावर घरात चुकीच्या वागणाऱ्या सदस्यांची शाळा घेतो. कालच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊनं जान्हवी, निक्की आणि अरबाज यांची हजेरी घेतली, हे बिग बॉस प्रेमींच्या पसंतीस उतरलं आहे. रितेश भाऊने प्रेक्षकांच्या मनासारखं केल्याची भावना नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये व्यक्त केली आहे.

रितेश देशमुखचं बिग बॉस प्रेमींकडून कौतुक

बिग बॉस मराठीचा यंदाचा पाचवा सीझन चांगलाच गाजताना दिसत आहे. पहिल्या दिवसापासून बिग बॉस मराठीने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत सर्वांना खिळवून ठेवलं आहे. यंदाचं बिग बॉस मराठीचं घर, थीम, स्पर्धक आणि होस्ट सर्वच लयभारी असल्याचं दिसत आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्या दिवसापासून या सीझनची खूप चर्चा होताना दिसत आहे. यंदाचा सीझन सर्वाधिक चर्चेत असण्यामागचं एक कारण म्हणजे रितेश देशमुख. रितेश देशमुखला सोशल मीडियावर चाहत्यांचा चांगला पाठिंबा मिळताना दिसत आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आधी ट्रोल, आता कौतुक

गेल्या काही आठवड्यांपासून भाऊच्या धक्कायवर नेटकऱ्यांच्या तिखट प्रतिक्रिया उमटताना दिसत होत्या. रितेश भाऊनं निक्की, जान्हवी, अरबाज आणि वैभव यांना अद्दल घडवत, त्यांना शिक्षा करत त्यांची दादागिरी बंद करावी, अशी मागणी प्रेक्षक करत होते. टीम एच्या जाचाला प्रेक्षक खूपच कंटाळले होते. नेटकऱ्यांनी कमेंट करत रितेश देखमुखनं ए टीमला आणखी तिखट शब्दात सुनावण्याची इच्छा वारंवार व्यक्त केली होती. या आठवड्यात मात्र, प्रेक्षकांची इच्छा पूर्ण झाली. या आठवड्यातील भाऊचा धक्का प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. काही दिवसांपूर्वी नेटकऱ्यांनी रितेशवर टीका करत त्याने होस्टिंग सोडण्याची भाषा केली होती, आता मात्र त्याच नेटकऱ्यांनी आता रितेश देशमुखचं कौतुक केलं आहे.

Bigg Boss Marathi : भाऊचे पॉईंट्स भारी, भाऊची होस्टिंग भारी, च्यामायला भाऊच एकदम लयभारी; रितेश देशमुखचं बिग बॉस प्रेमींकडून कौतुक

नेटकऱ्यांची प्रतिक्रिया काय?

भाऊच्या धक्क्यावर नेटकऱ्यांच्या विविध कमेंट्स पाहायला मिळत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलंय, "आज खरा भाऊचा धक्का झाला, एकच नंबर होस्टिंग, रितेश दादा", तर दुसऱ्याने लिहिलंय, "रितेश दादा, भाऊचा धक्का मनासारखा गाजवला... भाऊचे पॉईंट्स भारी, भाऊंचे एक्सप्लेनेशन भारी, भाऊंची होस्टिंग भारी, च्यामायला भाऊच एकदम लयभारी. जान्हवीची अवस्था ना घर का ना घाट का केली. बस आता आठवडाभर जेलमध्ये." तिसऱ्याने लिहिलंय, "रितेश विलासराव देशमुख... हलक्यात घेऊ नका." आणखीही नेटकऱ्यांनी "रितेश विलासराव देशमुख हलक्यात घेण्यासारख व्यक्तिमत्व नाही, खरी TRP तर रितेश भाऊंनी वाढवली आहे.", "आजचा धक्का एकदम जबरदस्त आहे, वा मज्जा आली असंच झालं पाहिजे.", "या सीझनचा सगळ्यात बेस्ट वीकेंड खतरनाक." अशा विविध कमेंट करत रितेश भाऊला फूल सपोर्ट दिला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : भाऊचा धक्का बोअर व्हायला लागलाय, रितेशनं होस्टिंग बंद करायला हवी, महेश मांजरेकरच हवे होते; प्रेक्षक वैतागले, सोशल मीडियावर कमेंट्सचा पूर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग; त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसानDevendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हते

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Embed widget