Supriya Pathare: सुप्रिया पाठारेच्या पोस्टनं वेधलं लक्ष; म्हणाली, "वर्षा बंगल्यावरून निघालो आणि वेगळ्याच रस्त्याने..."
Supriya Pathare: नुकतीच सुप्रियानं एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Supriya Pathare: मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री सुप्रिया पाठारे (Supriya Pathare) ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करते. सुप्रिया यंदा गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी वर्षा बंगल्यामध्ये गेली होती. याबाबत नुकतीच सुप्रियानं एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
सुप्रियाची पोस्ट
सुप्रियानं तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या डोक्यावर टोपी दिसत आहे. या टोपीवर 'उमरखाडीचा राजा' असं लिहिलेलं दिसत आहे. सुप्रियानं हा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'दरवर्षी उमरखाडीचा राजाचं दर्शन होतच होत पण या वर्षी जरा कठीण वाटलं,पण वर्षा बंगल्यावरून दर्शन घेऊन निघालो आणि वेगळ्याच रस्त्याने आलो ते थेट जेजे हॉस्पिटलचा सिग्नल,मग काही राहवलं नाही आणि या वर्षी दर्शन झालंच, बाप्पाचा हात पाठीशी असताना कसलीच चिंता नाही,गणपती बाप्पा मोरया'
सुप्रियानं शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सुप्रियाच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळत असते.
View this post on Instagram
सुप्रिया ही 'ठिपक्यांची रांगोळी' (Thipkyanchi Rangoli) या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. या मालिकेमध्ये तिनं माधवी विनायक कानिटकर (माई) ही भूमिका साकारली होती. तसेच मोलकरीण बाई,पुढचं पाऊल,होणार सून मी ह्या घरची या मालिकांमध्ये सुप्रियानं काम केलं. सुप्रियानं काही चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.
सुप्रिया पाठारे आणि तिच्या लेकाच्या रेस्टॉरंटचं काही दिवसांपूर्वी ओपनिंग झालं आहे. त्यांच्या या रेस्टॉरंटचं नाव महाराज फास्ट फूड कॉर्नर असं आहे. सुप्रिया पाठारे ही महाराज फास्ट फूड कॉर्नर या रेस्टॉरंटचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सुप्रिया पाठारे आणि तिचा लेक मिहीर पाठारे यांच्या नव्या रेस्टॉरंटच्या ओपनिंग कार्यक्रमाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
View this post on Instagram
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: