Sukh Mhanje Nakki Kay Asta: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत 25 वर्षांच्या लीप; मालिकेत येणार रंजक वळण
Sukh Mhanje Nakki Kay Asta: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Bhi Nakki Kay Asta) या मालिकेत पुढे काय घडणार? याची उत्सुकता दिवसागणिक वाढतेय.
Sukh Mhanje Nakki Kay Asta: छोट्या पडद्यावरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Bhi Nakki Kay Asta) या मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आहे. मालिकेत पुढे काय घडणार याची उत्सुकता दिवसागणिक वाढतेय. शालिनी षडयंत्र करुन जयदीप-गौरीचं आयुष्य संपवणार आहे. प्रेक्षकांची लाडकी जोडी कायमचा निरोप घेणार आहे.
शालिनीचा डाव यशस्वी होणार असला तरी खऱ्या प्रेमाचा कधीच अंत होत नाही. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत जयदीप-गौरीच्या पुनर्जन्माचा अध्याय सुरु होणार आहे. मालिकेच्या विश्वातला हा नवा प्रयोग आहे. ज्या जोडीला प्रेक्षकांचं इतकं भरभरुन प्रेम मिळालं ती जयदीप-गौरीची लोकप्रिय जोडी अधिराज आणि नित्या या नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या वळणासह मालिकेचं कथानक 25 वर्षांनी पुढे सरकणार आहे. त्यामुळे अधिराज आणि नित्याची प्रेमकहाणी नव्याने अनुभवता येईल.
पुनर्जन्माच्या या कथेत अनेक रहस्यांचाही उलगडा होणारा आहे. सोबतच अनेक नवी पात्रही भेटीला येतील. जयदीप-गौरीच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या शालिनीचं पुढे काय होणार? लक्ष्मी कुठे असेल? नंदिनी शिर्के पाटील कुठे असतील? नित्या-अधिराजची भेट कशी होणार? या आणि अश्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या नव्या पर्वातून उलगडतील.
पाहा प्रोमो:
View this post on Instagram
'सुख म्हणजे नक्की काय असतं' चे कलाकार
अभिनेत्री गिरीजा प्रभू (Girija Prabhu), मंदार जाधव (Mandar Jadhav) ,वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar), माधवी निमकर (Madhavi Nimkar) यांनी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली आहे. मालिकेतील गौरी जयदीप शिंदे (Gauri Jaydeep Shinde) ही भूमिका गिरीजानं साकारली आहे, तर जयदीप सूर्यकांत शिंदे ही भूमिका मंदार जाधवनं साकारली आहे. या मालिकेत अभिनेत्री माधवी निमकर शालिनी ही भूमिका साकारते.
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहेत. या मालिकेच्या टायटल साँगला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या मालिकेच्या आगामी एपिसोडची अनेक प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :