Madhavi Nimkar: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील खडूस शालिनी खऱ्या आयुष्यात आहे मल्टी टॅलेंटेड; जाणून घ्या फिटनेस फ्रीक माधवी निमकरबद्दल...
सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेमुळे माधवी निमकरला (Madhavi Nimkar) विशेष लोकप्रियता मिळाली.
Madhavi Nimkar: सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेत अभिनेत्री माधवी निमकर शालिनी ही भूमिका साकारते. शालिनी ही जयदीप आणि गौरीला त्रास देण्याचे काम करत असते. जयदीप आणि गौरीच्या आयुष्यात अडथळे निर्माण करायचे एवढेच काम शालिनीला जमत असतं. पण शालिनी ही भूमिका साकारणारी माधवी निमकर ही खऱ्या आयुष्यात फार वेगळी आहे. ती मल्टी टॅलेंटेड असून फिटनेस फ्रीक अभिनेत्री आहे. जाणून घेऊयात माधवी निमकरबद्दल...
माधवी ही तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. माधवी ही वर्क आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. माधवी योगा देखील करता.
View this post on Instagram
माधवी ही अनेक वेळा फणसातील गरे काढणे, चुल पेटवणे यांसारखी कामं करतानाचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर करते. अभिनयक्षेत्रात काम करत असतानाच माधवी ही इतर कामं देखील आवडीनं करते.
View this post on Instagram
माधवी ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. माधवीला इन्स्टाग्रामवर 430K फॉलोवर्स आहेत. अनेक वेळा माधवी ही सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेच्या सेटवरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. काही दिवसांपूर्वी माधवीनं एक व्हिडीओ शेअर केला होता, त्यामध्ये दिसत होते की, माधवी ही शूटिंग दरम्यान क्रिकेट खेळत आहे.
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमुळे माधवीला विशेष लोकप्रियता मिळाली. माधवीबरोबरच सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये गिरिजा प्रभू, मंदार जाधव आणि वर्षा उसगावकर हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारतात. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहेत. या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
PHOTO: खलनायिकेच्या भूमिका साकारणारी अभिनेत्री माधवी निमकरचे भन्नाट लुक्स!