Sukh Mhanje Nakki Kay Asta : शालिनीचा नवा डाव, दादा-माईंसह जयदीप-गौरीलाही करायला लावणार डीएनए टेस्ट!
Sukh Mhanje Nakki Kay Asta : जयदीप हा दादा-माईंचा मुलगा नसून, गौरी त्यांची मुलगी असल्याचे मोठे रहस्य आता समोर आले आहे. त्यामुळे मालिकेत आता मोठा बदल होणार आहे.
Sukh Mhanje Nakki Kay Asta : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर पोहोचली आहे. या मालिकेत आता एका मोठ्या सत्याचा उलगडा झाला आहे. जयदीप हा दादा-माईंचा मुलगा नसून, गौरी त्यांची मुलगी असल्याचे मोठे रहस्य आता समोर आले आहे. त्यामुळे मालिकेत आता मोठा बदल होणार आहे. शिर्के-पाटलांच्या घरात आता मोठं वादळ येणार आहे. या वादळाचा फटका घरातील सर्वांनाच बसणार आहे.
शिर्के-पाटलांच्या घरात शिरलेल्या एका अज्ञात व्यक्तीने या सत्याचा उलगडा केला आहे. या व्यक्तीने अम्माचे नाव घेतल्याने घरातील सगळ्या लोकांनी त्यांच्याकडे या गोष्टीची विचारणा केली होती. यावेळी अम्मांनी सत्य सर्वांसमोर सांगितले. यावेळी अम्मा आपण काय लपवत होतो आणि तो माणूस आपल्याला का धमकी देत होता, याची कारणं सांगितली. मात्र, यावेळी त्यांनी एका सत्याचा खुलासा केला. हे सत्य ऐकल्यानंतर शिर्के-पाटलांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.
जयदीप नाही, गौरी शिर्के-पाटलांची लेक!
अम्मा सगळ्यांना सांगते की, जयदीप हा माई आणि दादासाहेबांचा मुलगा नाही. तो सूर्यकांतचा मुलगा आहे. तर, गौरी ही दादा आणि माईंची पोटची मुलगी आहे. हे सत्य ऐकून आता माई-दादांसह घरातील सगळ्यानांच मोठा धक्का बसला आहे. रंगनाथने मरताना अम्माला हे सत्य सांगितलं आहे. आता या सत्याच्या खुलाशामुळे जयदीप-गौरीसह संपूर्ण शिर्के-पाटलांच्या आयुष्यात मोठं वादळ निर्माण झालं आहे.
शालिनी खेळणार नवा डाव!
घरातील परिस्थिती बघून आता शालिनी पुन्हा एकदा नवी चाल खेळणार आहे. यामुळे पुन्हा एकदा शिर्के-पाटलांच्या घरावर मोठं संकट कोसळणार आहे. अम्मांच्या खुलाशानंतर आता शालिनीने सगळ्यांसमोर डीएनए चाचणी करण्याची मागणी ठेवली आहे. शालिनी माई-दादांसह जयदीप आणि गौरीलाही डीएनए चाचणी करण्यास भाग पडणार आहे. यातून येणाऱ्या निर्णयानंतर शालिनी पुन्हा एकदा आपल्याच कुटुंबाविरोधात कट रचणार आहे.
हेही वाचा :
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या