Sonali Bendre : 'इंडियाज बेस्ट डान्सर'मध्ये मोठा बदल, सोनाली बेंद्रे ऐवजी 'ही' अभिनेत्री परीक्षकाच्या खुर्चीत दिसणार?
Sonali Bendre : 'इंडियाज बेस्ट डान्सर' या रिएल्टी शोच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या खुर्चीत अभिनेत्री सोनाली बेंद्रे दिसणार नसल्याचे वृत्त आहे.

Sonali Bendre : छोट्या पडद्यावर लोकप्रिय असलेल्या 'इंडियाज बेस्ट डान्सर' ( India's Best Dancer ) या रिएल्टी शोबाबत मोठी बातमी समोर आली आहे. 'इंडियाज बेस्ट डान्सर' या रिएल्टी शोच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या खुर्चीत अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) दिसणार नाही. सोनाली बेंद्रेच्या ऐवजी आता अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) ही परीक्षक म्हणून दिसणार आहे.
'न्यूज 18' ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, येत्या काही दिवसात करिश्मा कपूर 'इंडियाज बेस्ट डान्सर 4' शी संबंधित करारावर स्वाक्षरी करण्याची शक्यता आहे. यंदाच्या सीझनसाठी शोच्या प्रोडक्शन हाऊसकडून सोनाली बेंद्रेसोबत कोणताही संपर्क साधण्यात आला नाही. तिच्याऐवजी थेट करिश्मा कपूरशी संपर्क साधण्यात आला असल्याचे वृत्तात म्हटले आहे.
'इंडियाज बेस्ट डान्सर' या रिएल्टी शोमध्ये गीता कपूर आणि टेरेन्स लेव्हिस हे परीक्षक आहे. मलायका अरोराने 'इंडियाज बेस्ट डान्सर 3'मधील पहिले दोन एपिसोडमध्ये परीक्षक म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर पूर्ण सीझनमध्ये मलायकाऐवजी सोनाली बेंद्रेने जबाबदारी सांभाळली. 'इंडियाज बेस्ट डान्सर'च्या मागील सीझनमध्ये समर्पण लामाने बाजी मारली होती.
View this post on Instagram
चित्रपटातही एकत्र काम
सोनाली बेंद्रे आणि करिश्मा कपूर यांनी सपूत, रक्षक आणि हम साथ साथ है या चित्रपटात एकत्र काम केले आहे.
View this post on Instagram
सोनाली बेंद्रेची महत्त्वाची भूमिका असलेली ब्रोकन न्यूज ही वेब सीरिज नुकतीच 'झी5' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली होती. प्रेक्षकांनी या वेब सीरिजला चांगला प्रतिसाद दिला. या वेब सीरिजमध्ये जयदीप अहलावत आणि श्रिया पिळगावकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
करिश्मा कपूर ही नुकतीच 'मर्डर मुबारक' या चित्रपटात झळकली होती. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
इतर महत्त्वाची बातमी :
Mirzapur Season 3 Trailer : कालीन भैय्या गॉन, गुड्डू भैय्या ऑन, सत्तेचा संघर्ष आणि रक्तरंजित सूडनाट्य; अंगावर काटा आणणारा 'मिर्झापूर-3' चा ट्रेलर आउट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
