Siddharth Jadhav : 'होऊ दे धिंगाणा'चे 100 भाग पूर्ण, सिद्धार्थ जाधवने भावुक होत मानले प्रेक्षकांचे आभार; म्हणाला...
Siddharth Jadhav : अभिनेता सिद्धार्थ जाधवने होऊ दे धिंगणाचे 100 भाग पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
Siddharth Jadhav : अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) हा सध्या 'होऊ दे धिंगाणा' (Hou De Dhingana) या कार्यक्रमाची महत्त्वाची जबाबदारी पार पडत आहे. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करुन सिद्धार्थ प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करतोय. तसेच या कार्यक्रमातील प्रत्येक खेळ अगदी कलाकार देखील अगदी आनंदाने खेळतात. सिद्धार्थच्या सूत्रसंचालनाच्या एका वेगळ्या शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहे. नुकतच होऊ दे धिंगाणाच्या तिसऱ्या पर्वाचे नुकतेच 100 भाग पूर्ण झाले. त्यानिमित्ताने सिद्धार्थने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
सिद्धार्थने त्याच्या सोशल मीडियावर नुकतच पोस्ट करत प्रेक्षकांना धन्यवाद दिलं आहे. सिद्धार्थच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत अभिनंदन देखील केलंय. मागच्या पर्वात सुपरहिट ठरलेल्या साडे माडे शिंतोडे, बोबडी वळाली, धुऊन टाक, रेखाटा पटा पटा या फेऱ्या या पर्वातही आहेत. याच्या सोबतीला गरागरा आणि भराभरा, डब्बा डब्बा उई उई, स्मायली काय गायली अश्या अतरंगी फेऱ्या देखील या पर्वात आहेत. त्यामुळे हे मजेशीर खेळ खेळताना प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन होतं.
सिद्धार्थने पोस्ट करत काय म्हटलं?
सिद्धार्थने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, काय आणि कसे आभार मानू स्टार प्रवाहच्या टीमचे मला कळत नाही. आता होऊ दे धिंगाणाचा शंभरावा एपिसोड. मी या कार्यक्रमाचा भाग होईन किंवा हा कार्यक्रम मला होस्ट करायला मिळेल आणि महाराष्ट्राचे मायबाप रसिक प्रेक्षक एवढं प्रेम करतील हे कधीच वाटलं नव्हतं. मी खूप वेळा पहायचो की या मालिकेने शंभर भाग पूर्ण केले, या मालिकेने २०० भाग पूर्ण केले. पण आती मी त्या कार्यक्रमाचा भाग आहे ज्यांनी शंभर एपिसोड पूर्ण केले. हा एक कथाबाह्य कार्यक्रम आहे, ज्याचे शंभर भाग पूर्ण झालेत.
पुढे त्याने म्हटलं की, गेले तीन वर्ष हा कार्यक्रम मी होस्ट करत आहे. मात्र याचं सगळं क्रेडिट जातं स्टार प्रवाहचे बिझनेस हेड सतीश राजवाडे. श्रीप्रसाद क्षीरसागर, सुमेध, चिन्मय, अद्वैत दादा, निखिल, दीप सर, फ्रेम्स कंपनी आणि संपूर्ण टीमला. शब्दात मांडू शकणार नाही असा हा विषय आहे. पण येस मी पण अश्या एका कलाकृतीचा भाग आहे ज्यांनी शंभर एपिसोड्स पूर्ण केलेत आणि हे शक्य झालं तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे. खूप आभार. असंच प्रेम ठेवा आणि खूप भारी फीलिंग आहे...खरं सांगतो. लव्ह यू ऑल...!