एक्स्प्लोर

मोदींची मिमिक्री महागात, कॉमेडियन श्याम रंगीला एलिमिनेट

प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पाल यांनी श्याम रंगीलाची बाजू उचलून धरली आहे. 'नेत्यांची मिमिक्री करण्यात काहीच हरकत नाही, फक्त तो निखळ विनोद असायला हवा.' असं पाल म्हणाले.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची मिमिक्री करण्यासाठी प्रसिद्ध असलेला विनोदवीर श्याम रंगीला याला नुकताच 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. विशेष म्हणजे एपिसोडमध्ये त्याने केलेली मिमिक्री ऑन एअर दाखवली जाणार नाही. मोदी आणि राहुल गांधी यांची नक्कल करता येणार नाही, तुला शोसाठी नवीन कंटेंट तयार करावा लागेल, असं श्यामला सांगण्यात आलं. कंटेंट तयार करण्यासाठी त्याला फारसा वेळही देण्यात आला नाही. पर्यायाने त्याचं एलिमिनेशन करण्यात आलं.

अक्षय, तुझ्या मुलीला कोणी 'ती' कमेंट केली तर? : मल्लिका

या प्रकारामुळे 22 वर्षांचा श्याम प्रचंड चिडला असून त्याने कार्यक्रमाच्या टीमवर नाराजी व्यक्त केली आहे. 'मी मोदींची नक्कल करण्यात पटाईत असल्याचं त्यांना माहित होतं. मग शोमध्ये सहभागी होण्याचं निमंत्रणच का दिलं.' असं श्याम रंगीला म्हणतो. 'मोदींची नक्कल करता येणार नाही, हे त्यांनी आधी सांगितलं होतं. सुरुवातीला राहुल गांधींची फिरकी घेतल्यास चॅनेलची हरकत नव्हती. मात्र अचानक त्यांनी राहुल किंवा मोदी, या कोणाचीही मिमिक्री करता येणार नाही, असं सांगितलं. मी पंतप्रधानांना शिव्या तर घातल्या नव्हत्या. मी फक्त मिमिक्री केली. त्यात काय वावगं?' असा सवाल श्यामने केला आहे. प्रसिद्ध कॉमेडियन आणि 'द ग्रेट इंडियन..'च्या पहिल्या पर्वाचा विजेता सुनील पाल यांनी श्याम रंगीलाची बाजू उचलून धरली आहे. 'नेत्यांची मिमिक्री करण्यात काहीच हरकत नाही, फक्त तो निखळ विनोद असायला हवा.' असं पाल म्हणाले. 'मी नाना पाटेकर, इरफान खान यासारख्या अनेक अभिनेत्यांची मिमिक्री केली आहे, पण कोणी कधीच आक्षेप घेतला नाही.' असं सुनील पाल यांनी सांगितलं. 'चॅनेलने हा एपिसोड दाखवायला हवा होता. मला खात्री आहे मोदींनाही कुठला आक्षेप नसता. मोदींविषयी त्याने कोणताही अपशब्द काढला नाही, की त्यांना काही वाईट-साईट बोलला नाही' असं पाल म्हणाले. श्याम रंगीला कोण आहे? राजस्थानचा रहिवासी असलेला श्याम रंगीला हा शेतकऱ्याचा मुलगा आहे. राजस्थानातील श्री गंगानगर जिल्ह्यातल्या रायसिंहनगरमधील मोहकमवाला गावात लहानाचा मोठा झाला. 2004 मध्ये शाळेतूनच त्याने मिमिक्रीला सुरुवात केली. लहानपणापासूनच त्याला कॉमेडियन होण्याची इच्छा होती. आपलं स्वप्न साकार करण्यासाठी त्याने मिमिक्री करणं सुरु केलं. यूट्यूबवर 30 हजार फॉलोवर्स श्याम रंगीलाचं स्वतःचं यूट्यूब चॅनल असून त्याचे जवळपास 30 हजार फॉलोवर्स आहेत. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' मधून एलिमिनेट झाल्यानंतरही त्याच्या प्रसिद्धीत तसूभरही फरक पडलेला नाही. त्याचे व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Devoleena Bhattacharjee On Tukaram Munde: प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
Sanjay Jadhav On Daughter Dhriti Affairs: 'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव कोणतेही आढेवेढे न घेता थेटच बोलले
'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव असं का बोलले?
Scam 2010 Web Series: 24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?
24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Embed widget