एक्स्प्लोर
'मराठी बिग बॉस'मध्ये आणखी एक वाईल्ड कार्ड एण्ट्री
राजेशची बातमी ताजी असतानाच, आता बिग बॉसच्या घरात आणखी एक वाईल्ड कार्ड एण्ट्री होणार आहे.
मुंबई: दिवसेंदिवस कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’ या शोमध्ये रंगत येत आहे. नुकतंच अभिनेता राजेश शृंगारपुरे बिग बॉसच्या घरातून आऊट झाला आहे.
राजेशची बातमी ताजी असतानाच, आता बिग बॉसच्या घरात आणखी एक वाईल्ड कार्ड एण्ट्री होणार आहे. अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत बिग बॉसच्या घरात येणार असल्याची चर्चा आहे. तशी विचारणा शर्मिष्ठाला कलर्सकडून करण्यात आली आहे.
गेल्याच आठवड्यात अभिनेत्री हर्षदा खानविलकर ही सुद्धा वाईल्ड कार्डद्वारे बिग बॉसच्या घरात आली आहे. त्यानंतर आता अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतही तशीच एण्ट्री करण्याची शक्यता आहे.
कोण आहे शर्मिष्ठा राऊत?
'मन उधाण वाऱ्याचे' या मालिकेत शर्मिष्ठा राऊतने साकारलेली नीरजाची भूमिका प्रचंड गाजली होती. यात ती नकारात्मक भूमिकेत दिसली होती.
त्यानंतर ती 'उंच माझा झोका', 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकांमध्येही झळकली.
शर्मिष्ठाने योद्धा, नवरा माझा भोवरा यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
तर शेखर फडकेसोबत तिने 'जो भी होगा देखा जायेगा' हे विनोदी नाटकही केलं होतं. यानंतर 'कॉमेडीची जीएसटी एक्स्प्रेस'मध्ये तिने प्रेक्षकांना खळखळवून हसवलं.
शर्मिष्ठा राऊतची प्रतिक्रिया
दरम्यान, याबाबत एबीपी माझाने शर्मिष्ठा राऊतची प्रतिक्रिया जाणून घेतली. शर्मिष्ठा म्हणाली, "मला बिग बॉसबाबत विचारणा झाली आहे. मात्र मी अजून हो की नाही हे कळवलेलं नाही. बिग बॉसच्या घरात मोबाईल किंवा काहीही न घेता राहाणं जमेल का, सध्याचं वातावरण, माझी प्रतिमा या सर्वाचा मी विचार करत आहे"
राजेश शृंगारपुरे आऊट
मराठी बिग बॉसच्या घरातून अभिनेता राजेश शृंगारपुरे बाहेर पडला आहे. ‘विकेंडचा डाव’ या एपिसोडमध्ये ‘बिग बॉस’ महेश मांजरेकर यांनी याबाबतची घोषणा केली.
बिग बॉस मराठी : मेघा, आस्ताद किंवा राजेश जिंकतील : अनिल थत्ते
रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपुरे यांच्यातील जवळीकीमुळे दोघेही चांगलेच चर्चेत आहेत. या दोघांना बिग बॉस आणि वाईल्ड कार्ड एण्ट्री घेतलेल्या अभिनेत्री हर्षदा खानविलकरने चांगलंच झापलं होतं.
सगळ्या नाट्यमय घडामोडींमुळे राजेश शृंगारपुरेला आता बीग बॉसच्या घरातून डच्चू मिळाला आहे.
सर्वात आधी बायकोला मिठी मारली
बिग बॉसच्या घरात मी काहीही चुकीचं केलेलं नाही. माझं कुटुंब, मित्र परिवार किंवा कोणालाही वाईट वाटेल, ते दुखावतील असं काही केलं नाही. रेशम टिपणीस आयुष्यभरासाठी माझ्या घरातील सदस्य असेल, असं अभिनेता राजेश शृंगारपुरेने सांगितलं.
बाहेर आल्यावर पहिल्यांदा बायकोला...... : राजेश शृंगारपुरे
‘मराठी बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडलेल्या राजेश शृंगारपुरेने एबीपी माझाशी खास गप्पा मारल्या.
बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर सर्वात आधी बायकोला मिठी मारली. तिलाही आनंद झाला, असं राजेश शृंगारपुरेने सांगितलं.
रेशम कायमची माझ्या घरची सदस्य असेल
मी जे वागलो ते खरं होतं. रेशमसोबतचे माझं नातं आयुष्यभरासाठी असेल. एक मैत्रिण म्हणून ती कायमची माझ्या घरची सदस्य असेल. बिग बॉस मराठीमध्ये एक जिवाभावाची मैत्रिण मला भेटली, असं राजेश शृंगारपुरेने सांगितलं.
बिग बॉसमधील स्पर्धक
बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात अभिनेत्री उषा नाडकर्णी, रेशम टिपणीस, जुई गडकरी, सई लोकुर, मेघा धाडे, आरती सोळंकी, ऋतुजा धर्माधिकारी, स्मिता गोंदकर, तर अभिनेता राजेश शृंगारपुरे, पुष्कर जोग, आस्ताद काळे, भूषण कडू, सुशांत शेलार, अनिल थत्ते आणि विनीत भोंडे यांनी सहभाग घेतला. तर हर्षदा खानिवलकराची वाईल्ड कार्डद्वारे एण्ट्री झाली आहे.
यापैकी विनीत भोंडे, आरती सोळंकी, अनिल थत्ते आणि राजेश शृंगारपुरे हे एलिमनेट झाले म्हणजेच ते घराबाहेर पडले.
तर ऋतुजा धर्माधिकारीच्या हाताला दुखापत झाल्याने ती वैद्यकीय कारणामुळे घराबाहेर गेली आहे. त्यामुळे आता 11 जण बिग बॉसच्या घरात राहिले आहेत.
संबंधित बातम्या
राजेश शृंगारपुरे 'मराठी बिग बॉस'च्या घरातून बाहेर
बाहेर आल्यावर पहिल्यांदा बायकोला...... : राजेश शृंगारपुरे
‘बिग बॉस’मधून राजेश शृंगारपुरे बाहेर पडणार? बिग बॉसच्या घरातील हर्षदाच्या एन्ट्रीला भरभरुन प्रतिसाद मराठी बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एण्ट्री करणाऱ्या अभिनेत्रीचं नाव.... रेशम-राजेशचं वर्तन अश्लील, नाशिकमध्ये तक्रार बिग बॉस मराठी : मेघा, आस्ताद किंवा राजेश जिंकतील : अनिल थत्ते बिग बॉस मराठी : जुई गेमर, भूषणने इमेज बिघडवली : आरतीअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement