एक्स्प्लोर

Dr Priya Passes Away : आठ महिन्यांची गरोदर असताना अभिनेत्रीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 35 व्या घेतला अखेरचा श्वास

Dr Priya Passes Away: अभिनेत्री डॉ प्रियाचे (Dr Priya) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.ती आठ महिन्यांची गरोदर होती.

Dr Priya Passes Away:  गेल्या काही दिवसांपासून मल्याळम चित्रपटसृष्टीमधून धक्कादायक घटना समोर येत आहे. अभिनेत्री रंजूषा मेनन (Renjusha Menon) ही तिच्या घरात मृतावस्थेत आढळून आली. त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीनं जगाचा निरोप घेतला आहे. करुथामुथू सारख्या शोमध्ये दिसलेली अभिनेत्री डॉ प्रियाचे (Dr Priya) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. 35 वर्षीय प्रियाने मंगळवारी (31 ऑक्टोबर) एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. तेव्हा ती आठ महिन्यांची गरोदर होती. तिच्या निधनानं मल्याळम मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

प्रियाच्या निधनानंतर अनेकांनी तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेता किशोर सत्या याने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करुन प्रियाला श्रद्धांजली वाहिली आहे. त्यानं पोस्टमध्ये लिहिलं,  'मल्याळम टेलिव्हिजन क्षेत्राला धक्का देणारा आणखी एक अनपेक्षित मृत्यू. काल हृदयविकाराच्या झटक्याने प्रियाचा मृत्यू झाला. ती 8 महिन्यांची गर्भवती होती. तिचे बाळ आयसीयूमध्ये आहे.तिला इतर कोणतीही आरोग्य समस्या नव्हती. काल ती रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये गेली होती. तेव्हा अचानक तिला हृदयविकाराचा झटका आला. प्रियाच्या आईवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या एकुलत्या एक मुलीच्या निधनानं ती खूप हादरली आहे.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kishor Satya (@kishor.satya)

 'देव अशा चांगल्या लोकांसोबत इतकं क्रूरपणे का वागत आहे? रंजूषाच्या निधनानंतर, आणखी एक मृत्यू. जेव्हा 35 वर्षांचा माणूस जग सोडून जातो तेव्हा शोक देखील व्यक्त कसा करावा? हे कळत नाही. प्रियाच्या नवऱ्याला आणि आईला या संकटातून कसे बाहेर काढायचे, माहीत नाही. त्यांच्या मनाला बळ मिळो.' असंही किशोरनं पोस्टमध्ये लिहिलं. किशोर सत्यानं शेअर केलेल्या पोस्टला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी प्रियाला श्रद्धांजली वाहिली आहे. प्रिया ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. करुथमुथू या लोकप्रिय शोमध्ये तिने किशोरसोबत स्क्रीन शेअर केली होती.लग्नानंतर तिने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतल्याचे दिसले. प्रियाही डॉक्टर होती.

अभिनेत्री रंजूषा मेनन ही काही दिवसांपूर्वी तिरुअनंतपुरममधील (Thiruvananthapuram) तिच्या फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळली. सोमवारी (30 ऑक्टोबर) सकाळी तिचा मृत्यू झालाय.  

इतर महत्वाच्या बातम्या:

Renjusha Menon Found Dead: अभिनेत्रीचं वयाच्या 35 व्या वर्षी निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget