Bigg Boss 16 Finale : प्रियांका चौधरी ते शिव ठाकरे; 'Top 5' स्पर्धकांमध्ये मोठी चुरस
Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16'च्या टॉप 5 (Top 5) स्पर्धकांमध्ये प्रियांका, शालीन, एमसी, अर्चना आणि शिव ठाकरे या पाच स्पर्धकांचा समावेश आहे.

Rohit Shetty in Bigg Boss Finale : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) 'बिग बॉस'चं 16 वं पर्व आता अंतिम टप्प्यात आलं आहे. काही तासांतच 'बिग बॉस 16'चा (Bigg Boss 16) कोण विजेता होणार हे समोर येणार आहे. नाट्य, वाद, आव्हाने, ट्विस्ट अशा अनेक गोष्टींनी या पर्वाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. पण आता या पर्वाच्या ग्रॅंड फिनालेकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. प्रियांका चहर चौधरी, शालीन भनोत, एमसी स्टॅन, अर्चनआ गौतम या स्पर्धकांचा 'टॉप 5'मध्ये (Top 5) समावेश झाला आहे.
रोहित शेट्टीची होणार अंतिम फेरीत एन्ट्री! (Rohit Shetty Entry Grand Finale)
'बिग बॉस 16'च्या ग्रॅंड फिनालेमध्ये 'खतरों के खिलाडी' फेम रोहित शेट्टीदेखील (Rohit Shetty) सहभागी होणार आहे. 'खतरों के खिलाडी'च्या पुढच्या पर्वासाठी रोहित 'टॉप 5' स्पर्धकांमधून एकाची निवड करणार आहे. अर्चना गौतम आणि शिव ठाकरे या स्पर्धकांची निवड रोहित करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे रोहित नक्की कोणाची निवड करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
'बिग बॉस 16'च्या स्पर्धकांचे नशीब उजळणार
'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर स्पर्धकांना अनेक प्रोजेक्टसाठी विचारणा होत असते. यंदाच्या पर्वातील स्पर्धकांनादेखील ही संधी मिळाली आहे. निमृत कौर अहलुवालियाला एकता कपूरच्या 'एलएसडी 2'मध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. अंकित गुप्ता आणि गौतम सिंह विग सध्या 'जुनूनियत' या त्यांच्या नव्या कार्यक्रमाची तयारी करत आहेत. यंदाच्या पर्वात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा त्यांचा लाडका अब्दु रोजिक 'बिग ब्रदर यूके' या कार्यक्रमात दिसणार आहे. टीना दत्ताला एक बिग बजेट दाक्षिणात्य सिनेमा मिळाला आहे. रिपोर्ट्सनुसार, एकता कपूरला शालिनचा अभिनय आवडल्याने 'ब्युटी अँड द बीस्ट'च्या हिंदी रिमेकमध्ये ती शालीन भनोटची निवड करणार आहे.
शिव ठाकरे होणार विजेता?
बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता, महाराष्ट्राची शान शिव ठाकरे (Shiv Thakare) 'बिग बॉस 16' जिंकावा अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपल्या माणसाला पाठिंबा देत आहेत. शिवच्या घरी आता त्याच्या स्वागताच्या तयारीला सुरुवात झाली आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत शिवच्या आईने शिवचं 'बिग बॉस 16' जिंकणार असा विश्वास व्यक्त केला आहे.
संबंधित बातम्या
Shiv Thakare Exclusive : माझा लेकच 'Bigg Boss 16' जिंकणार; शिव ठाकरेच्या आईने व्यक्त केला विश्वास
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
