Sai Lokur: तमन्ना भाटियाच्या गाण्यावर थिरकली सई लोकूर; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले, 'वजन कमी कर...'
सईनं अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या (Tamannaah Bhatia) कावाला (Kaavaalaa) या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे.
Sai Lokur: बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री सई लोकूर (Sai Lokur) ही सोशल मीडियावर सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ सई सोशल मीडियावर शेअर करते. नुकताच सईनं अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या (Tamannaah Bhatia) कावाला (Kaavaalaa) या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी सईला ट्रोल केलं आहे.
सईनं शेअर केला व्हिडीओ
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सई ही पिंक फ्लोरल पिंक ड्रेस आणि मोकळे केस अशा लूकमध्ये दिसत आहे. सईनं या व्हिडीओला 'Kaavaalaa' असं कॅप्शन दिलं आहे. सईच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
सईनं शेअर केलेल्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'पाय किती सुजले आहेत.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'तू जाड झाली आहे'. 'वजन जरा कमी कर' अशी कमेंट देखील एका नेटकऱ्यानं सईच्या या व्हिडीओला केली आहे.
View this post on Instagram
'कावाला' हे गाणं गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. हे गाणं ‘जेलर’ (Jailer) या चित्रपटातील आहे. या गाण्यात रजनीकांत यांची झलक देखील बघायला मिळते. या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ सध्या अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
सई लोकूरनं बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्ये सहभाग घेतला होता. या कार्यक्रमामुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली. सईनं कुछ तुम कहो कुछ हम कहे,पकडा गया,मिशन चॅम्पियन,प्लॅटफॉर्म,पारंबी,आम्हीच तुमचे बाजीराव, कीस किसको प्यार करू या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
सई ही सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करते तिला इन्स्टाग्रामवर 315K फॉलोवर्स आहेत. सई सध्या फुकेत येथे ट्रीप एन्जोय करत आहे. या ट्रीपचे फोटो सईनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
View this post on Instagram
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: