Bigg Boss 18 : 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री बिग बॉस हिंदीमध्ये झळकणार? निर्मात्यांकडून विचारणा झाल्याची माहिती
Bigg Boss Hindi Season 18 : बिग बॉस हिंदीसाठी एका मराठमोळ्या अभिनेत्रीला विचारणा करण्यात आल्याची माहिती सध्या समोर आली आहे.
Bigg Boss Hindi Season 18 : 'बिग बॉस' (Bigg Boss Hindi Season 18) हा लोकप्रिय शो अनेकांच्या आवडीचा आहे. त्याचप्रमाणे बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी अनेकजण इच्छुकही असतात. हिंदीत सुरु झालेला हा कार्यक्रम आता अनेक भाषांमध्येही प्रसारित केला जातो. पण तरीही हिंदी बिग बॉसमध्ये सहभागी होण्याच्या संधीची अनेकजण वाट पाहत असतात. त्यातच आता एका मराठी अभिनेत्रीला बिग बॉस हिंदीसाठी विचारणा झाल्याची माहिती सध्या समोर आली आहे.
याआधी बिग बॉसच्या घरात अभिजीत बिचुकले, मेघा धाडे ही मंडळी सहभागी झाली होती. मेघा धाडे तर मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वाची विजेती आहे. त्यानंतर तिने हिंदी बिग बॉसच्याही घरात एन्ट्री घेतली. आई कुठे काय करते फेम अभिनेत्री रुपाली भोसले हिला देखील बिग बॉसच्या घरासाठी विचारण्यात आल्याची माहिती सध्या समोर आली आहे.
रुपाली बिग बॉस हिंदीमध्ये जाणार?
रुपाली भोसले सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे. संजना असं तिच्या पात्राचं नाव आहे. त्याचप्रमाणे तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची देखील बरीच पसंती मिळाली. त्यामुळे बिग बॉस हिंदीच्या निर्मात्यांकडून रुपालीला विचारणा झाल्याची माहिती समोर आली. पण अद्याप यावर रुपालीने कोणत्याही प्रकारचं भाष्य केललं नाही. त्यामुळे ती बिग बॉस हिंदीच्या घरात जाणार की नाही, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
हिंदी मालिकाविश्वात रुपाली
रुपालीने आतापर्यंत हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. सोनी टिव्हीवरील सुमित राघवनसोबतची तिची बडी दूर सें आये हैं ही मालिका विशेष गाजली. या मालिकेतून ती हिंदी मालिकाविश्वातही सक्रिय झाली होती. त्यामुळे ती बिग बॉस हिंदीच्याही घरात दिसण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान रुपाली ही याआधी बिग बॉस मराठीमध्ये देखील झळकली होती.
बिग बॉस 18चा सिझन लवकरच सुरु होणार आहे. यासाठी सोशल मीडिया स्टार, मालिका स्टार यांना विचारणा करण्यात आली आहे. यामध्ये शोएब इब्राहिम, दलजीत कौर , इशा कोपिकर, मिथिलेश पटनाकर, पायल मलिक, कृतिका मलिक, अर्जुन बिजलानी, करण पटेल यांची नावं सध्या चर्चेत आहेत.
View this post on Instagram