एक्स्प्लोर

Rishi Saxena : 'आई कुठे काय करते' मालिकेत नव्या अभिनेत्याची एन्ट्री, 6 वर्षांनी करणार मालिकाविश्वात दमदार कमबॅक

Rishi Saxena :  स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेत अभिनेत्याची एन्ट्री होणार असून हा अभिनेता 6 महिन्यांनी मालिकाविश्वात कमबॅक केलंय. 

Rishi Saxena :  'स्टार प्रवाह'ची (Star Pravah) लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मध्ये लवकरच सुप्रसिद्ध अभिनेता ऋषी सक्सेनाची (Rishi Saxena) एण्ट्री होणार आहे. ऋषीला याआधी आपण अनेक मराठी आणि हिंदी मालिका आणि सिनेमातून भेटलोय. तब्बल 6 वर्षांनंतर ऋषी मराठी टेलिव्हिजन विश्वात दमदार पुनरागमन करणार आहे. आई कुठे काय करते मालिकेत ऋषी मिहीर शर्मा ही व्यक्तिरेखा साकारताना दिसेल. 

ऋषी हा काहे दिया परदेस या मालिकेतून घरोघरी पोहचला होता. त्याच्या शिव या भूमिकेला प्रचंड पसंती मिळाली होती. पण त्यानंतर ऋषी हा मोठ्या पडद्यावर वळला. त्याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. नुकतीच त्याने महेश मांजरेकर यांच्या ही अनोखी गाठ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यामध्येही त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. 

'आई कुठे काय करते' ऋषी कोणती भूमिका साकारणार?

आई कुठे काय करते या मालिकेत मिहीर शर्मा ही व्यक्तीरेखा साकारणार आहे. त्याची आई अरुंधतीची खूप मोठी चाहती होती. आपल्या मुलाने अरुंधतीकडून गाणं शिकावं ही तिची इच्छा होती. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मिहीर अरुंधतीकडून गाण्याचे धडे गिरवणार आहे. दरम्यान या मालिकेतून ऋषी तब्बल 6 वर्षांनी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. 

ऋषीने काय म्हटलं? 

या भूमिकेविषयी सांगताना ऋषी म्हणाला, ‘स्टार प्रवाहसोबत काम करण्याची खूप दिवसांपासूनची इच्छा होती. अखेर ती इच्छा पूर्ण होतेय. आई कुठे काय करते ही मालिका माझीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी मालिका आहे.  आपल्या आवडीच्या मालिकेत काम करायला मिळणं हा माझ्यासाठी दुग्धशर्करा योग आहे. खरतर खूप दिवसांपासून मराठी मालिकेत कधी दिसणार अशी विचारणा होत होती. मी चांगल्या भूमिकेच्या शोधात होतो. आई कुठे काय करते मालिकेतल्या मिहीर या व्यक्तिरेखेसाठी मला विचारण्यात आलं आणि मला ही व्यक्तिरेखा खूपच भावली. जवळपास 6 वर्षांनंतर मी मराठी मालिकेत काम करतोय. शूटिंगच्या पहिल्या दिवशी थोडं टेन्शन होतं. मात्र सेटवर सगळ्यांनीच मला आपलसं करुन घेतलं. आजवर प्रेक्षकांनी माझ्या प्रत्येक भूमिकेला भरभरुन प्रेम दिलं आहे. हेच प्रेम या नव्या भूमिकेलाही देतील याची खात्री आहे.'

ही बातमी वाचा : 

Saara Kahi Tichyasathi : निशी आणि श्रीनूच्या आयुष्यात आलेल्या वादळामुळे काय-काय उध्वस्त होणार? सारं काही तुझ्यासाठी मालिका रंजक वळणावर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

श्रीरामपूर विधानसभेत नवा ट्विस्ट, विखे पाटलांचा शिंदेंच्या उमेदवाराला थेट इशारा, आता मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
श्रीरामपूर विधानसभेत नवा ट्विस्ट, विखे पाटलांचा शिंदेंच्या उमेदवाराला थेट इशारा, आता मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
मुंबईत मनसेचा शिवसेना शिंदेंच्या उमेदवारास पाठिंबा, कर्जतसह 3 मतदारसंघात घेतली भूमिका
मुंबईत मनसेचा शिवसेना शिंदेंच्या उमेदवारास पाठिंबा, कर्जतसह 3 मतदारसंघात घेतली भूमिका
Maha Vikas Aghadi Manifesto : लाडकी बहिणवरून टीका झाली, आता योजनांवर पैसा कोठून आणणार? मल्लिकार्जुन खरगेंच्या उत्तराने राऊत अन् सुप्रिया सुळेंची सुद्धा कळी खुलली!
लाडकी बहिणवरून टीका झाली, आता योजनांवर पैसा कोठून आणणार? खरगेंच्या उत्तराने राऊत अन् सुप्रिया सुळेंची सुद्धा कळी खुलली!
मोदीसाहेब कर्जमाफी करणार नाहीत, ते भाषण करण्यात हुशार, पण निर्णय घेण्यात नाहीत, शरद पवारांचा टोला  
मोदीसाहेब कर्जमाफी करणार नाहीत, ते भाषण करण्यात हुशार, पण निर्णय घेण्यात नाहीत, शरद पवारांचा टोला  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Full PC:  मविआ , महायुती ,अपक्ष कोणालाही माझा पाठिंबा नाहीOm Raje Nibalkar -Sharad Pawar :  सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही - शरद पवारAmit Shah : सरकार स्थापनेसाठी उद्धव ठाकरेंची मदत घेण्याचा प्रश्नच नाही,अमित शाहांचं स्पष्टीकरणKarale Master Full Speech : सावंतांवर निशाणा,शिंदेंवर हल्ला; कराळे मास्तरांचं स्फोटक भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्रीरामपूर विधानसभेत नवा ट्विस्ट, विखे पाटलांचा शिंदेंच्या उमेदवाराला थेट इशारा, आता मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
श्रीरामपूर विधानसभेत नवा ट्विस्ट, विखे पाटलांचा शिंदेंच्या उमेदवाराला थेट इशारा, आता मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
मुंबईत मनसेचा शिवसेना शिंदेंच्या उमेदवारास पाठिंबा, कर्जतसह 3 मतदारसंघात घेतली भूमिका
मुंबईत मनसेचा शिवसेना शिंदेंच्या उमेदवारास पाठिंबा, कर्जतसह 3 मतदारसंघात घेतली भूमिका
Maha Vikas Aghadi Manifesto : लाडकी बहिणवरून टीका झाली, आता योजनांवर पैसा कोठून आणणार? मल्लिकार्जुन खरगेंच्या उत्तराने राऊत अन् सुप्रिया सुळेंची सुद्धा कळी खुलली!
लाडकी बहिणवरून टीका झाली, आता योजनांवर पैसा कोठून आणणार? खरगेंच्या उत्तराने राऊत अन् सुप्रिया सुळेंची सुद्धा कळी खुलली!
मोदीसाहेब कर्जमाफी करणार नाहीत, ते भाषण करण्यात हुशार, पण निर्णय घेण्यात नाहीत, शरद पवारांचा टोला  
मोदीसाहेब कर्जमाफी करणार नाहीत, ते भाषण करण्यात हुशार, पण निर्णय घेण्यात नाहीत, शरद पवारांचा टोला  
MVA Election Manifesto 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसने डाव टाकला, जातनिहाय जनगणनेला सुरुवात, 80 हजार कर्मचारी कामाला लावले
विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसने डाव टाकला, जातनिहाय जनगणनेला सुरुवात, 80 हजार कर्मचारी कामाला लावले
Maha Vikas Aghadi Manifesto : कंत्राटी नोकरभरती बंद, एमपीएसी निकालासाठी कालमर्यादा, सुशिक्षित बेरोजगारांना मानधन; महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात युवकांसाठी काय काय?
कंत्राटी नोकरभरती बंद, एमपीएसी निकालासाठी कालमर्यादा, सुशिक्षित बेरोजगारांना मानधन; महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात युवकांसाठी काय काय?
Hiray Family : निमगावच्या 'हिरे' घराण्याची चर्चा तर होणारच; दहा हजार लोकवस्तीच्या गावाने दिले आठ आमदार
निमगावच्या 'हिरे' घराण्याची चर्चा तर होणारच; दहा हजार लोकवस्तीच्या गावाने दिले आठ आमदार
Maha Vikas Aghadi Manifesto : लाडक्या बहिणींपेक्षा सुशिक्षित बेरोजगारांना सर्वाधिक मानधन; जन्माला येणाऱ्या लेकींसाठी मविआची मोठी घोषणा
लाडक्या बहिणींपेक्षा सुशिक्षित बेरोजगारांना सर्वाधिक मानधन; जन्माला येणाऱ्या लेकींसाठी मविआची मोठी घोषणा
Embed widget