Ramayana : 'रामायण'मध्ये प्रभू रामाची भूमिका साकरण्यासाठी किती मिळायचं मानधन? जाणून घ्या छोट्या पडद्यावरी 'राम' अरुण गोविल यांचं नेटवर्थ
Ramayana : 'रामायण' मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल (Arun Govil) आजही चाहत्यांच्या मनात आहेत.
![Ramayana : 'रामायण'मध्ये प्रभू रामाची भूमिका साकरण्यासाठी किती मिळायचं मानधन? जाणून घ्या छोट्या पडद्यावरी 'राम' अरुण गोविल यांचं नेटवर्थ Ramayana Ram Arun Govil Charges For Serial Show Know Actor Net Worth Television Entertainment Latest Update Marathi News Ramayana : 'रामायण'मध्ये प्रभू रामाची भूमिका साकरण्यासाठी किती मिळायचं मानधन? जाणून घ्या छोट्या पडद्यावरी 'राम' अरुण गोविल यांचं नेटवर्थ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/27/48249bd536c42f33ab1de4ecf6299b1f1709049181638254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Arun Govil Net Worth : आपण साकारत असलेल्या पात्राच्या नावावर आपल्याला ओळखलं जातं असं खूप कमी कलाकारांच्या बाबतीत होतं. 'रामायण' (Ramayana) या मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल (Arun Govil) 'प्रभू राम' या नावाने आजही ओळखले जातात. अरुण गोविल यांना चाहत्यांनी कायम श्रीरामाचा दर्जा दिला आहे. त्यांच्या अभिनयाचं आजही खूप कौतुक होतं.
'रामायण' मालिकेत श्रीरामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांनी प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. या मालिकेच्या माध्यमातून ते घराघरांत पोहोचले. पण रामाची भूमिका सोडली तर अरुण गोविल यांच्या वाट्याला चांगल्या भूमिका आल्या नाहीत. यामी गौतम (Yami Gautam) अभिनीत 'आर्टिकल 370' (Article 370) या सिनेमात अरुण गोविल महत्त्वाच्या भूमिकेत झळकत आहेत. त्यांच्या भूमिकेचं चाहत्यांकडून कौतुक होत आहे.
रामाच्या भूमिकेसाठी अरुण गोविल यांनी किती मानधन घेतलेलं? (Arun Govil Charges For Ramayana)
अरुण गोविल यांनी रामाची दमदार भूमिका साकारली आहे. त्यामुळे नक्कीच या भूमिकेसाठी त्यांनी तगडं मानधन घेतलं असणार असं चाहत्यांना वाटतं. पण खरंतर 'रामायण'च्या एका एपिसोडसाठी अरुण गोविल यांना फक्त 50 हजार रुपये मिळत असे.
View this post on Instagram
'रामायण'चे 71 एपिसोड झाले. त्यामुळे या बहुचर्चित मालिकेचं अरुण गोविल यांना 40 लाख रुपयांचं मानधन मिळालं. मालिकेची लोकप्रियता पाहता हे मानधन खूपच कमी आहे. या मालिकेमुळे अरुण गोविल यांना इतर मालिकांसाठी विचारणा झाली नाही. अरुण गोविल यांना श्रीरामाच्या भूमिकेत पाहायला प्रेक्षकांना जास्त आवडलं.
अरुण गोविल नेटवर्थ (Arun Govil Net Worth)
अरुण गोविल यांची नेटवर्थ पाच मिलियन डॉलर ते सहा मिलियन डॉलरच्या आसपास आहे. म्हणजेच त्यांची एकूण संपत्ती 41 कोटी ते 49 कोटींच्या आसपास आहे.
रामानंद सागर यांची रामायण ही मालिका 1987 मध्ये प्रसारित झाली होती. लॉकडाऊनमध्ये देखील ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. 'रामायण' मालिकेतील संगीत लोक आजही आवडीनं ऐकतात. या मालिकेला संगीत रवींद्र जैन यांनी दिले आहे. आता 'रामायण' ही मालिका पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या
Ramayan: रामानंद सागर यांची 'रामायण' मालिका पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)