एक्स्प्लोर

Rakhi Sawant : राखी सावंतचा बॉयफ्रेंड आदिलला मिळाली जीवे मारण्याची धमकी, अभिनेत्री म्हणते ‘दूर राहा, नाहीतर...’

Rakhi Sawant : राखीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने आपला बॉयफ्रेंड आदिल याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे म्हटले आहे.

Rakhi Sawant : बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत (Rakhi Sawant) सतत काहीना काही कारणामुळे चर्चेत असते. आता नुकताच राखीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने आपला बॉयफ्रेंड आदिल (Aadil Durani) याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे म्हटले आहे. या कथित धमक्या आदिलला बिष्णोई टोळीकडून मिळत असल्याचा दावा अभिनेत्रीने केला आहे. 'ड्रामा क्वीन' या नावाने प्रसिद्ध असलेल्या राखी सावंतचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तिने फोनमधील ही धमकी दाखवली आहे. मात्र, राखीने बिष्णोई गँगला कडक ताकीद देत आदिल खानपासून दूर राहण्यास सांगितले आहे.

‘आदिलने राखी सावंतला सोडावे अन्यथा त्याला मारून टाकू’, असे या धमकीवजा मेसेजमध्ये लिहिले आहे. सदर धमकी देणारा व्यक्ती हा बिष्णोई गटाचा आहे. हसन नावाच्या व्यक्तीने ही धमकी आदिल याच्या फोनवर पाठवली आहे. पण, राखी सावंतही आता संतापली आहे. तिने धमकी देणाऱ्या व्यक्तीलाच उलट धमकावले आहे. तिने या व्यक्तीला आदिलपासून दूर राहण्यासाठी इशारा दिला आहे. राखी सावंतचा व्हिडीओ पापाराझी विरल भयानी यांच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ :

आदिलला धमकी मिळाल्यानंतर राखी खूप संतापली असून, ती दु:खीही झाली आहे. राखी म्हणाली की, 'मी खूप दुःखी आहे, माझ्या आदिलला धमक्या येत आहेत. राखीपासून दूर राहा, आम्ही बिष्णोई गटाचे आहोत, आम्ही तुम्हाला मारून टाकू, असे ते म्हणत आहेत. आम्ही अशा धमक्यांना घाबरत नाही. आम्ही एकमेकांवर प्रेम करतो.’

राखी म्हणते, ‘आमचे काय चुकले आहे? तुम्ही आम्हाला धमक्या का देत आहात?  आदिल माझे आयुष्य आहे. मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही.’ अभिनेत्री पुढे म्हणाली की, 'तुम्ही अशा धमक्या देणे बंद करा. पहिला मला संपवून दाखवा. प्रेम करणे ही चोरी, गुन्हा आहे का? माझ्या आदिलला काहीही करू नका. तुम्ही माझ्या भावासमान आहात, बहिणीचे घर असे उध्वस्त करू नका.’

आदिल आणि राखीच्या नात्याची चर्चा

राखी ही सध्या आदिल दुर्रानीला डेट करत आहे. राखीचे आदिलसोबतचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ‘बिग बॉस’ या शोमुळे राखीला लोकप्रियता मिळाली. राखी तिच्या विनोदी वक्यव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. आदिल दुर्रानी याने राखीला नुकतीच एक बीएमडब्ल्यू कार आणि दुबईत घर भेट म्हणून दिले आहे. आदिल राखीसोबत मुंबईत डान्स अकादमी उघडण्याचा विचार करत आहे.

‘आयटम गर्ल’ म्हणून करियरची सुरुवात केलेली ही अभिनेत्री कधी आपल्या फॅशनेबल कपड्यांमुळे, तर कधी वेगवेगळ्या वादग्रस्त वक्तव्यांनी लोकांच्या कायम लक्षात राहते. कॉन्ट्रव्हर्सी क्वीन राखी सावंत नेहमी काहीतरी निमित्ताने माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरते. राखी सावंत आणि कॉन्ट्रव्हर्सीचे कनेक्शन खूप जुने आहे.

संबंधित बातम्या :

Rakhi Sawant Home Tour Video : राखी सावंतचा आलिशान महाल! ‘ड्रामा क्वीन’चं दुबई स्थित घर पाहिलंत का?

महत्त्वाच्या बातम्या

Aai Tuljabhavani Colors Marathi Serial Track: 'आई तुळजाभवानी' मालिकेत व्यसनाला हरण्यासाठी प्रकटणार देवीचं अलौकिक 'व्यसनखंडीनी रूप', PHOTOs
'आई तुळजाभवानी' मालिकेत व्यसनाला हरण्यासाठी प्रकटणार देवीचं अलौकिक 'व्यसनखंडीनी रूप', PHOTOs
Savalyachi Vari: 'सावळ्याची वारी'मधून विठ्ठलभक्तीचा सुरेल गजर; श्रद्धेचा भावस्पर्शी अनुभव देणारं भक्तिगीत
'सावळ्याची वारी'मधून विठ्ठलभक्तीचा सुरेल गजर; श्रद्धेचा भावस्पर्शी अनुभव देणारं भक्तिगीत
Sumeet Raghavan On Student Protest: 'ही मुलं दहशतवादी...', विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवर मराठमोळ्या अभिनेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाला?
'ही मुलं दहशतवादी...', विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवर मराठमोळ्या अभिनेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाला?
Vanita Kharat Joined Students Protest: हातात संविधान अन्...; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात, प्रियदर्शनी इंदलकर विद्यार्थ्यांसोबत उतरल्या रस्त्यावर, PHOTOs
हातात संविधान अन्...; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात, प्रियदर्शनी इंदलकर विद्यार्थ्यांसोबत उतरल्या रस्त्यावर, PHOTOs

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
Embed widget