एक्स्प्लोर

Divyanka Tripathi Shared Motherhood Experience: 'ब्रेस्टफिडिंगमुळे होणाऱ्या वेदना... बाळाला फायदा पण, आईचं काय?'; दिव्यांका त्रिपाठीचं स्तनपानाबाबतचं 'ते' वक्तव्य VIRAL

Divyanka Tripathi Shared Motherhood Experience:  दिव्यांकानं स्तनपानाविषयी मोकळेपणानं भाष्य केलं असून, या प्रक्रियेत अनेक महिलांना ज्या आव्हानांचा सामना करावा लागतो, त्यावर प्रकाश टाकला आहे. 

Divyanka Tripathi Shared Motherhood Experience: लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री (TV Actress) दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) तिची प्रेग्नंन्सी आणि आता तिच्या जुळ्या बाळांमुळे (Motherhood Experience) चर्चेत आहे. पती विवेक दहियासोबत जुळ्या मुलांचं स्वागत केल्यापासून, दिव्यांका तिचे अनुभव सातत्यानं चाहत्यांसोबत शेअर करत आहे. आता तिनं स्तनपानाविषयी (Breastfeeding) मोकळेपणानं भाष्य केलं असून, या प्रक्रियेत अनेक महिलांना ज्या आव्हानांचा सामना करावा लागतो, त्यावर प्रकाश टाकला आहे. 

दिव्यांकानं शेअर केली मदरहुड जर्नी (Divyanka Tripathi Motherhood Journey)

एका अलिकडील यूट्यूब व्लॉगमध्ये दिव्यांका त्रिपाठीनं सांगितलं की, आई होऊन जवळपास दोन महिने उलटूनही ती अजूनही स्तनपानाच्या प्रक्रियेला समजून घेण्याचा आणि त्यात जुळवून घेण्याचा प्रयत्न करतेय. अभिनेत्रीनं नमूद केलं की, बाळासाठी आईच्या दुधाचे फायदे यावर लोक वारंवार चर्चा करतात, पण या काळात आईला ज्या शारीरिक आणि मानसिक संघर्षातून जावं लागतं, त्याबद्दल मात्र फारशी चर्चा केली जात नाही.

"बाळाला फायदा होतो..., पण आईचं काय?" (Divyanka Tripathi On Breastfeeding)

दिव्यांकानं ब्रेस्टफिडिंगबाबत प्रश्न उपस्थित करत म्हटलं की, याबाबत मोकळेपणानं बोललं का नाही जात? तिनं आपला एक्सपीरियंस शेअर करताना म्हटलं की, "बाळाला आईच्या दुधामुळे फायदा होतो, पण आईचं काय?"

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

"ब्रेस्टफीडिंग... एवढंही सोपं नाही"

अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीनं सांगितलं की, बाहेरून पाहताना ब्रेस्टफीडिंग करणं जितकं सोपं वाटतं, तितकं ते नेहमीच नसतं. बाळानं योग्य प्रकारे 'लॅच' न करणं, स्तनात दूध साचल्यामुळे होणाऱ्या वेदना आणि निपल्सवर होणाऱ्या जखमा किंवा वेदना यांसारख्या समस्या नव्या आईसाठी खूप आव्हानात्मक ठरू शकतात. याव्यतिरिक्त, आपल्याला पुरेसं दूध तयार होत आहे ना? याचीही महिलांना अनेकदा चिंता वाटते.

पाहुण्यांसमोर वेदना लपवाव्या लागतात... 

दिव्यांकानं मातृत्वकाळातील अशाच एका आव्हानावर प्रकाश टाकला, ज्याची अनेक महिलांना जाणीव असते. तिनं नमूद केलंय की, घरी पाहुणे आल्यावर वेदना आणि थकवा असूनही महिला अनेकदा हसतमुख राहून आपली भूमिका पार पाडत असतात.

"आई झाल्यानंतर विविध आव्हानांचा सामना..."

अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीनं सांगितलं की, पाहुणे जर दोन-तीन तासांपेक्षा जास्त वेळ थांबले, तर तिच्यासाठी परिस्थिती कठीण होते. अशा वेळी, आपल्याला वेदना होत आहेत, हे समोरच्याला कसं सांगायचं? असा प्रश्न तिला पडतो. दिव्यांकाच्या मते, आई झाल्यानंतर येणाऱ्या अडचणींविषयी महिलांनी मोकळेपणानं बोलणं गरजेचं आहे.

यापूर्वी, दिव्यांकानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून आपल्या स्तनपानाच्या प्रवासाबद्दल माहिती दिली होती. तिनं सांगितलेलं की, जुळ्या मुलांना स्तनपान करताना तिला अनेकदा शंका यायच्या आणि ती स्वतःलाच प्रश्न विचारायची. मात्र, तज्ज्ञांचा सल्ला आणि अचूक माहितीमुळे हा प्रवास तिच्यासाठी काहीसा सोपा झाला.

"आई आणि मुल या दोघांकडेही लक्ष देणं आवश्यक..."

विशेष म्हणजे, दिव्यांकासोबतची ही चर्चा महत्त्वाची आहे, कारण ती ग्लॅमरच्या जगापासून दूर राहून मातृत्वकाळातील प्रत्यक्ष आव्हानांबद्दल भाष्य करते. आई आणि मुलं या दोघांच्याही गरजा आणि सोयीसुविधांकडे समान लक्ष दिलं पाहिजे, यावर ती भर देते.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Divyanka Tripathi Shared Motherhood Experience: 'ब्रेस्टफिडिंगमुळे होणाऱ्या वेदना... बाळाला फायदा पण, आईचं काय?'; दिव्यांका त्रिपाठीचं स्तनपानाबाबतचं 'ते' वक्तव्य VIRAL
'ब्रेस्टफिडिंगमुळे होणाऱ्या वेदना... बाळाला फायदा पण, आईचं काय?'; दिव्यांका त्रिपाठीचं स्तनपानाबाबतचं 'ते' वक्तव्य VIRAL
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Satluj: रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
Dashmi Marathi Movie Poster: महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Embed widget