Rajpal Yadav : '...म्हणून मी जेठालाल ही भूमिका नाकारली'; राजपाल यादव यांनी सांगितलं कारण
राजपाल (Rajpal Yadav) यांनी एका मुलाखतीमध्ये (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेमध्ये काम न करण्याचे कारण सांगितले.
Rajpal Yadav : छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका गेली 14 वर्ष प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. या मालिकेतील कलाकरांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. मालिकेतील 'जेठालाल' ही भूमिका अभिनेते दिलीप जोशी (Dilip Joshi) हे साकारतात. जेठालाल ही भूमिका दिलीप यांच्या आधी बॉलिवूडमधील काही इतर अभिनेत्यांना ऑफर करण्यात आली होती. त्यापैकी एक अभिनेते म्हणजे राजपाल यादव (Rajpal Yadav).
रिपोर्टनुसार, 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या निर्मात्यांनी जेव्हा या मालिकेची ऑफर राजपाल यांना दिली, तेव्हा त्यांनी मालिकेत काम करण्यास नकार दिला. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेमध्ये काम करण्यास राजपाल यांनी का नकार दिला? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. राजपाल यांनी एका मुलाखतीमध्ये या मालिकेमध्ये काम न करण्याचे कारण सांगितले. ते म्हणाले की, 'मला अशी भूमिका साकारायला आवडते जी माझ्यासाठी लिहिलेली असते. दुसऱ्यांसाठी लिहिलेल्या भूमिकेमध्ये मला काम करायला आवडत नाही.'
राजपाल यादव यांच्याबरोबरच एहसान कुरैशी आणि कीकू शारदा यांना देखील जेठालाल या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. 28 जुलै 2008 रोजी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
संबंधित बातम्या
- Kangana Ranaut : कंगना रणौतला दिलासा देण्यास दंडाधिकारी न्यायालयानं दिला नकार
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Godavari : कॅनडा, न्यूझीलंड, गोवा, पुणे नंतर 'गोदावरी' आता न्यूयॅार्कमध्ये झळकणार!
- Nora Fatehi : बालपणी डान्स केल्यानं आईचा खाल्ला मार, आज आहे बॉलिवूडची 'डान्सिंग स्टार'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha