Purva Kaushik Post : "आता ह्या क्षणाला कसं काय, कुठून बोलावं? तेही कळत नाहीये..."; सासुबाईंच्या निधनानंतर 'शिवा' फेम अभिनेत्रीची भावुक पोस्ट
Purva Kaushik Shares Emotional Post: 'शिवा' फेम अभिनेत्रीवर काही दिवसांपूर्वीच दुःखाचा डोंगर कोसळला. पूर्वा कौशिकच्या सासुबाईंचं निधन झालं.
Purva Kaushik Shares Emotional Post: झी मराठीच्या मालिका नेहमीच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. यापैकीच एक असलेली झी मराठीवरची सुपरडुपर हिट मालिका 'शिवा'. या मालिकेतून अभिनेत्री पूर्वा कौशिक (Purva Kaushik) घराघरांत पोहोचली. शिवाची भूमिका साकारणाऱ्या पूर्वा कौशिकमुळे मालिका घराघरांत पोहोचली आणि प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरली. नेहमीच 'शिवा'च्या भूमिकेमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री पूर्वा कौशिक आता तिच्या सोशल मीडियावरच्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीनं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले असून एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे.
'शिवा' फेम अभिनेत्रीवर काही दिवसांपूर्वीच दुःखाचा डोंगर कोसळला. पूर्वा कौशिकच्या सासुबाईंचं निधन झालं. त्यानंतर भावूक झालेल्या अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी केली आहे. पूर्वानं सासुबाईंसोबतचे काही फोटो शेअर करत एक भावनिक पोस्ट केली आहे.
पूर्वा कौशिकनं सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?
अभिनेत्री पूर्वा कौशिकनं सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय की, "एक नातं जन्माने परिस्थिती ने तयार होतं ते रक्ताच नातं त्याला आपण नातेवाईक नाव देतो.. हे सर्वसामान्य आहेच... पण एखादं नातं हे आपण नैसर्गिक पणे,समजून उमजून सांभाळतो त्या नात्याला काय नाव द्यायचं हे कधी मुळात मला कळलंच नाही.... तसच नातं आहे हे आई तुमचं आणि माझं... खूप मन भरून आलंय डोकं जड झालंय... काय बोलावं काय करावं कळत नाहीये... मग एक जाणवलं तुम्ही आता असं काही झालं असतं तर काय केलं आता तर लिहिलं असतं! तर तसच काहीस वाटतंय..."
View this post on Instagram
"आई मी आयुष्यात खरंच खूप काहि चांगलं केलं असावं की तुम्ही आई म्हणून माझ्या आयुष्यात आलात.... 25शी नंतर माझ्या आयुष्याच्या नवीन पर्वाला सुरुवात झाली.... मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा तुमच्यासारखी स्त्री पहिली ,अनुभवली जी माझी मैत्रीण, आई , सासू ,बहीण सगळं होतं... मी खूप कधी व्यक्त झाले नाहीये ... माणूस अनुभवाने समृद्ध होत जातो असं म्हणतात .. मला माझं माणूसपण जपण्यात तुमचीच साथ होती आहे आणि आयुष्यभर असेल... आता ह्या क्षणाला कसं काय कुठून बोलावं तेही कळत नाहीये.... डोळ्यासमोरून ६ वर्षांचा काळ एकदम एखाद्या एक्स्प्रेस सारखा जातोय .... खुप जास्त heavy feel होतंय... पण तुम्ही जिथे कुठे आहात तिथे एकदम छान शांत मनमोकळेपणाने रहा... तुमच्या आवडीचे बटाट्याचे चिप्स खा ... Ice cream Amul च kha... आता अडवायला येणार नाही .. हे खा ते खाऊ नका असं नाही म्हणणार... तुमच्या मझ्यासोबत च्या आठवणी कायम माझ्यासोबात ठेवणार आहे मी... माणूस म्हणून प्रवास सुरूच राहणार आहे... कळत नकळत तुमच्यासारखी होण्याचा असण्याचा प्रयत्न होत असतो.. तो करत राहणार आहे आयुष्भर.... माझ्यासोबत रहा बस..... एवढंच .... तुमची पूर्वा.."