Punha Kartvya Ahe : ही भंगार मालिका पहिली बंद करा, 'पुन्हा कर्तव्य आहे'चा ट्रॅक पाहून प्रेक्षक संतापले; सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
Punha Kartvya Ahe : पुन्हा कर्तव्य आहे मालिकेचा ट्रॅक पाहून प्रेक्षक संतापले आहेत.
Punha Kartvya Ahe : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील 'पुन्हा कर्तव्य आहे' (Punh) मालिकेमध्ये वसुंधराने लकीचं सत्य सगळ्यांना सांगितलं. त्यानंतर आकाशला मोठा धक्का बसतो. पण आकाश हॉस्पिटलमध्ये दाखल असताना आकाशची आई धमकी देऊन वसुंधराकडून घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या करुन घेते. मात्र आकाश हॉस्पिटलमधून आल्यावर त्याच्यापासून वसुंधरा सगळं सत्य लपवते आणि आकाश-वसूचं नातं कायमचं तुटणार असल्याचं मालिकेत पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या याच ट्रॅकवर सध्या प्रेक्षक संतापल्याचं चित्र आहे.
पुन्हा कर्तव्य आहे मालिकेत पुनर्विवाहाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. त्यातच आकाश आणि वसुंधराचं नातंही आता प्रेमाचं वळण घेत होतं. त्यातच लकी हा वसुंधराचा पहिला नवरा असल्याचं सत्य सगळ्यांसमोर येतं. त्यानंतर आकाश आणि कुटुंबातले सगळेजण तिच्यावर बरेच संतापतात आणि त्यातच आकाशला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं. त्याचा फायदा घेऊन आकाशची आई वसुंधराकडून घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या करुन घेते.
नवा प्रोमो समोर
मालिकेचा नवा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे. यामध्ये आकाश वसुंधराला विचारतो की, लकी तुमचा नवरा होता का? त्यावर वसुंधरा हो म्हणते...तुमचे सासू-सासरे तुमच्याशी खोटं बोलले आहेत, हे तुम्हाला माहित होतं का? तेव्हाही वसुंधरा हो माहित होतं असं म्हणते...पोलिसांत द्यायला लागू नये म्हणून तुम्ही घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या केल्या का? त्यावरही वसुंधरा हो असं म्हणते...हे सगळं खरंय असं वसुंधरा आकाशला म्हणते. त्यावर आकाश आपलं नातं संपलं असं तिला सांगतो.
मालिकेच्या ट्रॅकवर प्रेक्षक संतापले
मालिकेच्या या प्रोमोवर कमेंट्स करत, मालिका खूप छान सुरु झाली होती...पण आता मालिकेची कथा खूप भरकटतेय..त्यामुळे आनंद मिळण्याऐवजी राग राग होतो..एकतर मालिका बंद करा किंवा कथा बदला.. मोस्ट स्ट्रेसफुल सिरियल अॅवॉर्ड गोज् टू पुन्हा कर्तव्य आहे...काहीतरी आवडेल असं दाखवा..अशा मालिका दाखवून झी मराठीचे नाव खराब करु नका...बकवास मलिका... जी काही उरलेली अपेक्षा होती ती ही भंग झाली,पण का ?तुम्ही स्वतःच असे tracks आणतात ज्याने करून मालिका बघणारे कमी होतील, नुसतं negativity आणि illogical गोष्टी भरून ठेवली आहे या मालिकेत...ही भंगार मालिका पहिली बंद करा... प्रेक्षकांनी त्यांचा संताप व्यक्त केला आहे.
View this post on Instagram