एक्स्प्लोर
Advertisement
पुण्याचा मानबिंदू बालगंधर्व रंगमंदिर पाडून नव्याने बांधणार
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या संकल्पनेतून 1962 साली हे रंगमंदिर बांधण्यास सुरुवात झाली आणि 1968 मध्ये ते बांधून पूर्ण झालं.
पुणे : पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर पाडून नव्याने बांधण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. मात्र नवं 'बालगंधर्व' कसं असेल याबाबत महापालिकेतील सत्ताधारी स्पष्ट बोलण्यास तयार नाहीत. बालगंधर्व रंगमंदिराची प्रेक्षक क्षमता वाढवण्यासाठी रंगमंदिर आणि बाजूच्या परिसराचा विकास करण्याची गरज असल्याचं सत्ताधारी म्हणत आहेत, मात्र पुनर्विकासाच्या नावाखाली बालगंधर्व परिसरातील मोकळ्या जागेवर राजकारण्यांचा डोळा नाही ना, अशी शंका पुणेकर व्यक्त करत आहेत.
बालगंधर्व रंगमंदिर गेल्या 50 वर्षांपासून पुण्याच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख राखून आहे. इथे सादर होणारी नाटकं असो, सांस्कृतिक-सामाजिक कार्यक्रम असोत किंवा राजकीय मेळावे. बालगंधर्वला कार्यक्रम झाला, की त्याची दखल पुणेकर घेतात, असं मानलं जातं. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या संकल्पनेतून 1962 साली हे रंगमंदिर बांधण्यास सुरुवात झाली आणि 1968 मध्ये ते बांधून पूर्ण झालं.
निव्वळ एक सभागृह इतकीच बालगंधर्व रंगमंदिराची ओळख नाही. मुख्य सभागृहासोबतच इथे कलादालन आहे. चारही बाजूला भरपूर मोकळी जागा आहे. तिथे वेगवेगळी प्रदर्शनं आयोजित केली जातात. झाडाझुडपांनी आजूबाजूचा परिसर नटलेला आहे. बालगंधर्वच्या आवारात नेहमीच रसिकांची गर्दी असते. परंतु ही मोकळी जागाच बालगंधर्वच्या मुळावर उठते की काय अशी शंका व्यक्त होत आहे.
महापालिकेकडून बालगंधर्वचा पुनर्विकास करण्याच ठरवण्यात आलं आहे. त्यासाठी संपूर्ण बालगंधर्व पाडणार की मुख्य इमारत आहे तशीच ठेवणार, याबाबत मात्र महापालिकेतील सत्ताधारी स्पष्ट बोलण्यास तयार नाहीत. वास्तुविशारदांकडून आराखडा तयार करुन त्यावर निर्णय घेऊ असं सत्ताधारी सांगत आहेत.
सत्ताधाऱ्यांना बालगंधर्व परिसरातील मोकळी जागा खुणावत आहे, यात शंका नाही. मोकळ्या जागेचा उपयोग कलादालन आणि सभागृहाची क्षमता वाढवण्यासाठीच होईल. तिथे नव्याने काही थिएटर बांधली जातील, असं महापौर सांगतात, मात्र त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हा प्रश्न आहे.
खरं तर 50 वर्ष उलटूनही बालगंधर्व रंगमंदिराची इमारत व्यवस्थित आहे. ना त्याला कुठे गळती लागली, ना इतर कोणती समस्या निर्माण झाली. त्यामुळे काही पुणेकर बालगंधर्व पाडू नये, अशी भूमिका घेत आहेत. काहींच्या मते त्याबद्दल फार भावनिक होण्याची गरज नाही. काळाच्या ओघात आवश्यक ते बदल होण्यास हरकत नाही.
बालगंधर्व रंगमंदिराची उभारणी करताना पु ल देशपांडे यांनी फक्त सभागृहच नाही, तर एकूण परिसरच कला आणि संस्कृतीला साजेसा राहील, याची काळजी घेतली होती. मात्र त्यानंतर पुण्यात उभारण्यात आलेल्या इतर सभागृहांच्या बाबतीत ही बाब लक्षात घेतली गेली नाही आणि ती सभागृहे म्हणजे रुक्ष इमारती ठरलेल्या. पुनर्विकासाच्या नावाखाली बालगंधर्व रंगमंदिराचीही तशीच अवस्था होऊ नये, हीच पुणेकरांची अपेक्षा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement