'हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रतापला लग्नासाठी होकार का दिला? प्राजक्ता वायकुळनं स्वत: सांगितलं कारण; जाणून तुम्हीही म्हणालं, "वाह... मुलगा असावा तर असा"
Why Prajakta Waikul Said Yes to Prithvik Pratap, Know Love Story : प्राजक्ताने पृथ्वीकला लग्नासाठी होकार का दिला, याचं कारण तिने स्वत: सांगितलं आहे.
Prithvik Pratap - Prajakta Waikul Love Story : कॉमेडीयन आणि अभिनेता पृथ्वीक प्रताप नुकताच प्राजक्ता वायकुळ हिच्यासोबत लग्नबंधनात अडकला आहे. पृथ्वीक आणि प्राजक्ता यांनी गुपचूप लग्न उरकलं, त्यानंतर सोशल मीडियावर रोमँटिंक फोटो पोस्ट करत चाहत्यांसोबत गोड बातमी शेअर केली. यानंतर चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. अलिकडेच हे नवविवाहित जोडपं देवदर्शनालाही पोहोचलं होतं. पृथ्वीकने लाँगटाईम गर्लफ्रेंड प्राजक्तासोबत लग्नगाठ बांधली. यानंतर दोघांची लव्हस्टोरी जाणून घेण्याची चाहत्यांमध्ये फार उत्कंठा दिसून येत आहे. आता प्राजक्ताने पृथ्वीकला लग्नासाठी होकार का दिला, याचं कारण तिने स्वत: सांगितलं आहे.
पृथ्वीक प्रतापला लग्नासाठी होकार का दिला?
पृथ्वीक प्रताप आणि प्राजक्ता वायकुळ यांनी सुखी संसाराला सुरुवात केली आहे. त्यांचे चाहते फारच खूश आहेत. दोघांनीही लग्नानंतर देवदर्शन घेतलं आणि यंदा लग्नानंतरचा पहिला दिवाळ सण साजरा केला. प्राजक्ता आणि पृथ्वीकच्या लव्हस्टोरीबाबत जाणण्यासाठी त्यांचे चाहते खूपच उत्सुक आहेत. पृथ्वीकने लग्नासाठी कधी विचारलं आणि प्राजक्ताने त्याला लग्नासाठी होकार कसा दिला, हे त्यांनी सांगितलं आहे. पृथ्वीक आणि प्राजक्ताने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे.
एक प्रश्न आणि उत्तर
पृथ्वीकने प्राजक्ताला त्याच्या आईला भेटायला घेऊन गेला होता. पृथ्वीकच्या आईसोबत प्राजक्तांच्या छान गप्पा झाल्या. नंतर पृथ्वीक प्राजक्ताला घरी सोडायला बसने तिच्यासोबत निघाला. याआधी साधारण दोन-तीन महिन्यांआधी पृथ्वीकने तिला लग्नासाठी विचारलं होतं आणि प्राजक्ताला वेळ दिला होता. पण, आईला भेटवल्यानंतर त्याला स्पष्ट उत्तर हवं होतं. त्यावेळी बसमधून प्रवास करताना प्राजक्ताने त्याला एक प्रश्न विचारला, ज्याचं उत्तर मिळताच. तिने त्याला होकार दिला.
प्राजक्ता वायकुळनं स्वत: सांगितलं कारण
प्राजक्ताने सांगितलं की, मी पृथ्वीकला एक साधा प्रश्न विचारला. यावेळी प्राजक्ताचा प्रश्न होता की, जर कधी तुला तुझी आई आणि मी यातील एकाला निवडण्याची वेळ आली, तर तू कुणाला निवडशील. प्राजक्ताच्या या प्रश्नानंतर पृथ्वीक बराच वेळ शांत होता. त्यानंतर त्याने दिलेल्या उत्तराने प्राजक्ताने हसत आणि लाजत त्याला लग्नासाठी होकार दिला. यावेळी पृथ्वीकचं उत्तर होतं की, दोघींमधून एकाला निवडणं कठीण आहे. पुढे प्राजक्ताने तिने होकार देण्याचं कारण सांगितलं की, जर तो माझ्यासाठी आईला नाही सोडत आहे, तर नक्कीच तो इतर कुणासाठी मला नाही सोडणार.
पृथ्वीक काय म्हणाला?
यावर मुलाखतीत पृथ्वीक पुढे म्हणाला की "मी तिला म्हटलं होतं, तू प्रश्न फार अवघड विचारलायय, मी सांगतो मला वेळ का लागला. मी तिला म्हटलं सगळं मान्य आहे, पण आईला नाही सोडणार. एकवेळेस आपण आपलं नातं संपवू. जर आई प्रॉब्लेम वाटत असेल, तर एक वेळी आपण आपलं नातं थांबवू, कारण बाहेरुन तुला ती प्रॉब्लेम वाटत असेल, पण ती माझ्यासाठी कधीच प्रॉब्लेम नाही. मी आयुष्यभर आईसोबत राहीन". हे ऐकल्यानंतर प्राजक्ता थोडी लाजली आणि तिने पृथ्वीकला लग्नाला होकार दिला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :