Premachi Goshta Serial Update : मुक्ता इंद्राला सुनावणार खडे बोल; सागरच्या जाळ्यात विकृत कार्तिक अडकणार!
Premachi Goshta Serial Update : मुक्ताचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी सागरची धडपड सुरू असून आता कार्तिकसाठी त्याने जाळे फेकले आहे. सागर नेमकं काय करणार, मुक्ता इंद्राला काय सुनावणार हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
Premachi Goshta Serial Update : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेतील आजच्या भागात नवी घडामोड घडणार आहे. सईचे कपडे आणण्यासाठी गेलेल्या मुक्ताला इंद्रा उलटसुलट बोलते. पण, मुक्ता तिला प्रत्युत्तर देते. तर, दुसरीकडे मुक्ताचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी सागरची धडपड सुरू असून आता कार्तिकसाठी त्याने जाळे फेकले आहे. सागर नेमकं काय करणार, मुक्ता इंद्राला काय सुनावणार हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
सागरला पाहून आरतीला बसणार धक्का
सागरने कार्तिकच्या मोबाईलवर मेसेज पाठवल्यानंतर आरती ठरलेल्या ठिकाणी पोहचते. कार्तिक ऐवजी सागरला पाहून आरतीला धक्का बसतो. आरती सागरची माफी मागते. सागर आरतीला धीर देत सगळं सत्य सांग, नाहीतर पोलिसांना बोलावतो असे सांगतो. माझ्या बायकोने तुला मदत केली आणि तूच उलट तिला खोट्या प्रकरणात अडकवले असे सांगतो. त्यावर आरती कार्तिक हा खूपच वाईट माणूस आहे, मी काहीच सांगू शकत नाही असे आरती सांगते आणि निघून जाते.
इंद्राला मुक्ता खडे बोल सुनावणार
मुक्ता सईचे कपडे घेण्यासाठी घरी जाते. पण, इंद्राला तिला नको ते बोलते. तू आणि सावनीने माझं घर फोडण्याचा प्रयत्न केला, असे इंद्रा मुक्ताला म्हणते. त्यावर मुक्ता मी स्पष्टपणे सांगते की ज्या घरात कार्तिक सारखा माणूस आहे, त्या घरात मी सईला ठेवणार नसल्याचे मुक्ता सांगते. इंद्राला मुक्ताला कार्तिकची माफी सांगण्यास सांगते. मु्क्ता त्याला नकार देते आणि एक स्त्री असून तुम्ही स्त्रीच्या दृष्टीने विचार केला नसल्याचे सांगते. मुक्ता इंद्राला दोन शब्द ऐकवते आणि निघून जाते. इंद्राही मुक्ताच्या बोलण्याने विचारात पडते.
सावनीच्या बोलण्याने कार्तिकच्या मनात धाकधूक
इकडं कार्तिक सावनीला भेटतो. माझा फोन सागरकडे असल्याचे कार्तिक सांगतो. त्यावर सागर तुझ्या मोबाईलमधून माहिती काढेल असे कार्तिकला सांगते. सागर किमान एकदा तरी मुक्ताचे निर्दोषत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल असे सांगते आणि सागरकडून तुझा मोबाईल घे असे सावनी कार्तिकला सांगते.
कार्तिक देणार आरतीला धमकी
तर, सागर आरती निघून गेल्यानंतर सागर घडलेल्या सगळ्या घटनांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. इकडे घरी मुक्ता आपण तडकाफडकी दिल्लीला जाऊन चुकीचं पाऊल तर टाकत नाही ना? असा विचार करते. कार्तिकही सागरकडे फोन देऊन चूक तर केली नाही. तेवढ्यात तिथे आरती येते आणि तिला पाहून कार्तिक हडबडतो. आरतीदेखील सागरने बोलावले म्हणून मी इथे आली होती असे सांगते. कार्तिकही तिला धमकी देत या प्रकरणाचेही काही बोलायचे नाही असे सांगतो. आरतीदेखील त्याला विनवणी करते आणि कार्तिकने केलेले कारनाम्यांची उजळणी करते. कार्तिक आरतीला मी तुला खूप पैसे देतो, पण सागरला काहीही सांगायचे नाही असे सांगतो.