Premachi Goshta Serial Update : घरातील सगळ्यांसमोर मुक्ता करणार सागरला कीस; 'प्रेमाची गोष्ट'चा रोमँटिक एपिसोड
Premachi Goshta Serial Update : सागरने दिलेल्या कीसला मुक्ता रिटर्न कीस देणार आहे. घरातील सगळ्या लोकांसमोर मुक्ता सागरला कीस देणार आहे. मुक्ताच्या या कृतीने सागर स्तब्ध होतो.
Premachi Goshta Serial Update : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) या मालिकेत सध्या सागर-मुक्तामधील रोमँटिक एपिसोड सुरू आहे. सागरने दिलेल्या कीसला मुक्ता रिटर्न कीस देणार आहे. घरातील सगळ्या लोकांसमोर मुक्ता सागरला कीस देणार आहे. मुक्ताच्या या कृतीने सागर स्तब्ध होतो. तर, दुसरीकडे हर्षवर्धन लिव्ह इन रिलेशनशिपच्या करारावर सावनीची सही घेण्यासाठी गोखलेंच्या घरी येतो.
सगळ्यांसमोर मुक्ता घेणार सागरचा कीस
कोळी कुटुंबाच्या घरात मिहिरच्या लग्नाची सगळेजण चर्चा करत असतात. इंद्रा, स्वातीसह मुक्ता, सागरही चर्चा करत असतात. सागरला लग्नातील कॉश्च्यूम बद्दल विचारले जाते. त्यावेळी सागर मी केलेल्या कामाच्या बदल्यात काही मिळत नसेल तर काय करणार असे सागर बोलतो. सागरच्या बोलण्यातील रोख मुक्ताला समजतो. मुक्ता मिहिकाला सून करून घेतल्याबद्दल इंद्राचे आभार मानते तिच्या गालावर प्रेमाने पप्पी घेते. स्वातीचेही मुक्ता आभार मानते. सईला देखील प्रेमाने मुक्ता कीस करते. मुक्ता घरातल्या सगळ्यांसमोर सागरला कीस करते. मुक्ताच्या या कृतीने सागरला आश्चर्याचा धक्का बसतो. मुक्ता अशा प्रकारे आपल्याला कीस देईल अशी अपेक्षा त्याची नसते. सागरला स्तब्ध झालेला पाहून इंद्रा म्हणते हे सगळे काय होतं? आपल्याला दिलेली पप्पी वेगळी होती आणि सागरला दिलेली पप्पी स्पेशल होती का? यावर सगळेच हसतात.
हर्षवर्धनचा सावनीविरोधात डाव
हर्षवर्धनने आता आपल्या प्रॉपर्टीसाठी पुढील डाव टाकतो. सावनीच्या सह्या घेण्यासाठी तो गोखलेंच्या घरी येतो. त्यावेळी दारात मुक्ताला धडक बसते. त्यावेळी हर्षवर्धनच्या हातातील कागदपत्रे पडतात. त्यावर लिव्ह इन रिलेशनशिपचा असलेला उल्लेख मुक्ता वाचते आणि सावध होते. ती हर्षवर्धन पाठोपाठ घरी येते. हर्षवर्धनला पाहून माधवीच्या कपाळाला आठ्या येतात.
हर्षवर्धनला घरी पाहून सावनीला आनंद होतो. हर्षवर्धन सावनीला सांगतो की, मी तुझ्यासाठी मी एक व्हिला घेतला आहे. त्या ठिकाणी तुझ्या मैत्रिणींसोबत पार्टी करू शकशील. सावनीने सही करण्यासाठी हर्षवर्धनने खोटं सांगितले हे ऐकून मुक्ताला धक्का बसतो.
सावनी हर्षवर्धनने दिलेल्या पेपरवर सही करण्यासाठी उत्सुक असते. हर्षवर्धनवर तिचा आंधळा विश्वास असतो. हर्षवर्धनचा डाव हाणून पाडण्यासाठी मुक्ता विचार करत असते. त्याचवेळी मुक्ता हर्षवर्धनला विचारते की व्हिला नेमका कुठं घेतला आहे, म्हणजे सागरला सांगून घेता येईल. त्यानिमित्ताने सई-आदित्य देखील भेटतील असे म्हणते. त्यावर सावनीदेखील हर्षवर्धनला व्हिला कुठे आहे ते विचारते. सावनीच्या प्रश्नांच्या फैऱ्या झडत असताना दुसरीकडे डाव फसणार म्हणून हर्षवर्धनचा चेहरा पडतो. तेवढ्यात त्या कागदपत्रांवर मुक्ताच्या हातातून कॉफी सांडते.
मुक्ताच्या प्रेमात बुडाला सागर
इकडे ऑफिसमध्ये सागर मुक्ताच्या विचारात असतो. मिहिर त्याच्यासमोर येऊन बसला तरी त्याचे लक्ष नसते. अखेर मिहिर त्याला मोठ्याने हाक देत, त्याला धक्का देत तंद्रीतून बाहेर काढतो. नेमकं तुला काय झालंय असेही तो विचारतो. त्यावर सागर म्हणतो की, तुला काय सांगू नेमकं काय झाले, लव्ह इज इन एअर अशी भावना मनात आली आहे. मुक्ताने मला कीस केलं असल्याचे सागर मिहिरला सांगतो. त्यालाही आश्चर्याचा धक्का बसतो.