Premachi Goshta Serial Update : माधवीची मिहिका-मिहिरच्या लग्नाला मंजुरी! सागरला जाळ्यात अडकवण्यासाठी सावनीचा डाव
Premachi Goshta Serial Update : सागरचा खोटारडेपणा उघड होणार का, सावनी आदित्यच्या आडून सागरला फसवणार का, या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
Premachi Goshta Serial Update : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत आजच्या एपिसोडमध्ये नव्या घडामोडी घडणार आहेत. माधवी आता मिहिका आणि मिहिरच्या लग्नाला मंजुरी देते. तर, दुसरीकडे मुक्ताला सत्य सांगण्यासाठी सागरची धडपड सुरू असते. मिहिकामुळे माधवीच्या अपघाताची कोणतीही तक्रार पोलिसांत दाखल झाली नसल्याचे समोर येते. आता सागरचा खोटारडेपणा उघड होणार का, सावनी आदित्यच्या आडून सागरला फसवणार का, या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
मिहिर-मिहिकाच्या लग्नाला माधवी राजी...
मिहीरही मुक्ताला समजवतो. माधवी आजच्या आज गुरुजींना आजच्या आज घरी बोलवं असे मुक्ताला सांगते. मला मिहिकाचे लग्न करायचे आहे,असे सांगते. माधवीच्या या वक्तव्याने अनेकांना धक्का बसतो. मिहिका-मिहिरचा चेहरा पडतो. त्यावर माधवी मिहिरला कारणांशिवाय घरी येत जाऊ नका. नाहीतर जावई म्हणून मान कसा मिळणार? असे म्हणते. त्यावर घरातील सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. माधवी मिहिका-मिहिरच्या लग्नाला मान्यता देते. मुक्ता सागरला फोन करून ही गोड बातमी देते. सागरही आनंद व्यक्त करतो आणि मुक्ताला मी क्लिनिकला भेटायला येऊ का असे विचारतो. त्यावर मुक्ता त्याला क्लिनिकला भेटायला बोलवते.
मुक्ताच्या क्लिनिकमध्ये जाणार सागर...
सागर आणि मुक्ता क्लिनिकमध्ये बोलत असताना एक तिरसट पेशंट येतो. हा पेशंट बेशिस्तपणे बोलत असतो. सागरला राग अनावर होत असतो. मुक्ता सागरला बाहेर बसण्यास सांगते. मुक्ता त्या तिरसट पेशंटवर उपचार करते. तो पेशंट मुक्ताला उलटसुलट बोलतो. उपचार झाल्यावर मुक्ताच्या टेबलवर पैसे फेकतो. हे पाहून सागरला राग येतो. त्यांच्यात वादावादी होते. मुक्ता सागरला आवरते. पेशंट निघून गेल्यावर मुक्ता सागरला काही तरी सांगणार होतास याची आठवण करून देते. तेवढ्यात सागरला सावनीचा फोन येतो. मुक्ता सागरला आदित्यला भेटण्यास जाण्यास सांगते.
मिहिका मुक्ताला सांगणार पोलीस तक्रारीचे सत्य...
मिहिका मुक्ताला फोन करते. अपघाताचा तपास कुठंपर्यंत आला याची माहिती घेण्यासाठी मिहिका पोलीस ठाण्यात गेली असते. पण, पोलीस तिला कोणतीही अशी केस दाखल नसल्याचे सांगतात. मिहिका तातडीने फोन करून अशी कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याचे मुक्ताला सांगते. त्यावर मुक्ता आपण सागरशी बोलून घेते असे सांगते.
सागरला फसवण्यासाठी सावनीचा डाव...
इकडे सावनी सागरला आपल्या जाळ्यात फसवण्यासाठी प्रयत्न करते. आज आदित्यला भेटण्यासाठी सागर येणार असतो. आता त्यासाठी सावनी कट आखण्यास सुरुवात करते. सागरला फसवण्यासाठी सावनी आपला नवा डाव टाकण्यास सज्ज असते. सावनी सागरला गुंगीचे औषध टाकलेला ज्यूस पिण्यास देते. हा ज्यूस पिण्यास सागर नकार देतो. पण, सावनी त्याला आदित्यने हा ज्यूस केला असल्याचे कारण देते. त्यामुळे सागर नाईलाजाने ज्यूस पितो. ज्यूस प्यायल्यानंतर सागरला गुंगी येते.
हर्षवर्धन भरणार मुक्ताचे कान...
इकडे हर्षवर्धन पुन्हा मुक्ताच्या क्लिनिकमध्ये येतो आणि सावनीचे कान भरण्याचा प्रयत्न करतो. सागर हा अजूनही पहिल्या बायकोत गुंतला असल्याचे सांगतो. सागर आणि सावनीचे भेटणे जास्त वाढले आहे. आदित्यच्या नावाखाली दोघांचे भेटणं वाढलं आहे. एवढं कांड करूनही सागर सावनीची बाजू घेत असल्याचे हर्षवर्धन सांगतो. मुक्ताचा त्यावर विश्वास बसत नाही.