(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Premachi Goshta Episode Updates : आदित्यच्या फोनमुळे सागरच्या डोळ्यात आनंदाश्रू, तर मुक्ताला सतावतेय चिंता
Premachi Goshta Episode Updates : आदित्यच्या एका फोन कॉलमुळे सागरच्या डोळ्यात आनंदाश्रू येणार आहेत. तर, दुसरीकडे स्वाती आणि तिच्या नवऱ्यासाठी मुक्ता चिंतेत आहे.
Premachi Goshta Episode Updates : 'प्रेमाची गोष्ट'चा (Premachi Goshta) आजचा एपिसोड हा लेकापासून दूर झालेल्या बापाच्या मनातील दु:ख दाखवणारा असणार आहे. सागर-मुक्ताच्या संसारात आग लावण्यासाठी सावनी प्रयत्नशील आहे. आता या कटात ती नकळतपणे आपला लहान मुलगा आदित्यचा वापर करत आहे. आदित्यने सागरला आपल्या पासपोर्टवरील वडिलांच्या तुमचे नाव बदलून हर्षवर्धन यांचे ठेवायचे आहे असे सांगितल्याने सागर मनातून दु:खी झाला आहे. आता मात्र आदित्यच्या एका फोन कॉलमुळे सागरच्या डोळ्यात आनंदाश्रू येणार आहेत. तर, दुसरीकडे स्वाती आणि तिच्या नवऱ्यासाठी मुक्ता चिंतेत आहे.
'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आता नवीन वळण आले आहे. आदित्यचा वाढदिवस असल्याने इंद्रा आणि सागर त्याच्या आठवणीने मध्यरात्री हळवे होतात. इंद्रा आपल्या नातवाच्या आठवणी सांगताना भावूक होते. तर, मुलाच्या आठवणीने सागरच्या डोळ्यातही अश्रू येतात. सकाळी सागरला आदित्यचा फोन येतो. त्याने सागरला सुखद धक्का बसतो. त्यावेळी आदित्य त्याला त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीचे आमंत्रण देतो. आदित्यच्या आमंत्रणाने सागर अधिक आनंदी होतो. आदित्यने वाढदिवसाला बोलावले आहे,असे सांगितल्याने कुटुंबातील इतरांनाही आनंद होतो. इंद्रा आपल्या नातवासाठी गाजरच्या हलव्याचा बेत आखते. आदित्यने बोलावल्याने सागरच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात.
View this post on Instagram
मुक्ताला सतावतेय चिंता
सागरला आदित्यला वाढदिवसाच्या पार्टीला बोलावल्याने घरात आनंदाचे वातावरण आहे. तर, दुसरीकडे मुक्ताला स्वाती आणि तिच्या नवऱ्याची चिंता सतावत आहे. स्वाती आणि तिच्या नवऱ्याला 15 लाखांची आवश्यकता आहे. स्वातीच्या नवऱ्याला ब्लॅकमेल केलेल्या महिलेकडून पैशांची मागणी करण्यात आली आहे. या दोघांना पैशांची व्यवस्था करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. मुक्ताला स्वाती संपर्क साधते. त्यानंतर मुक्ता त्यांना पैशांची मदत करण्याची हमी देते. मुक्तालाही कमी वेळेत इतके पैसे कसे उभे करावे, याची चिंता सतावत आहे.