एक्स्प्लोर

Premachi Goshta Latest Episode : सावनीचा प्रत्येक डाव उलटा पडणार; मुक्ता देणार सडेतोड उत्तर

Premachi Goshta Latest Episode : 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेतील आजच्या एपिसोडमध्ये मुक्ता आणि सागरमधील भावनिक बंध दिसतील.

Premachi Goshta Latest Episode :   मुक्ताकडून पराभूत झाल्याने सावनीला प्रचंड धक्का बसला. त्यातून तिची चिडचिड होत असते. सावनी मुक्ता-सागरचा पाणउतारा करण्यासाठी प्रयत्न करते. मात्र, तिचा प्रत्येक डाव उलटा पडतो. तर, दुसरीकडे आदित्य आणि सागरला पुन्हा एकत्र कसे आणता येईल, याचा विचार मुक्ता करते. 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) या मालिकेतील आजच्या एपिसोडमध्ये मुक्ता आणि सागरमधील भावनिक बंध दिसतील. 

आजच्या एपिसोडमध्ये काय पाहाल?

मुक्ताने  सावनीला मॉडेलिंगच्या स्पर्धेत हरवल्याने तिचे घरी आनंदात, उत्साहात स्वागत होते. इंद्रादेखील आपल्या सूनबाईवर खूश आहे.  मुक्ताने कोळी साडी परिधान करण्याची इच्छा पूर्ण केल्याने आणि सावनीचा पराभव केल्याने इंद्रा खूश असते. घरी सगळे मुक्ताचे कौतुक करतात. घरच्या मंडळींनी कौतुक केल्याने मुक्ता हरखून जाते.

सावनीला धक्का

मुक्ताकडून पराभव स्वीकारावा लागल्याने सावनीला  धक्काला बसला आहे. तिला हा पराभव मान्य नसतो. नशेत धुंद असलेली सावनी आपण कधीच हरत नाही असे म्हणते. आईला अशा अवस्थेत पाहून आदित्य घाबरतो. मुक्ताने माझे हाल केले, माझा अपमान केला, ती कशी काय जिंकली, सावनी कधीच हारत नाही, असे ती नशेत बडबडत असते. आईची ही अवस्था पाहून आदित्य आणखीच घाबरतो. आपल्या आईची अशी अवस्था झाल्याने तो चिडतो, त्याच्या मनात संताप येतो

सावनी-सागरमध्ये शाब्दिक वाद

इकडं ऑफिसमध्ये सावनीचा फोटो हटवून मॉडेल म्हणून मुक्ताचे फोटो लावण्यात येतो. सावनी सागरला उद्देशून मुक्ता कधीही मॉडेल होऊ शकत नाही असे म्हणते. सागरदेखील सावनीला सुनावतो. तू सगळ्या स्पर्धेत हरली असून आयुष्याच्या स्पर्धेतही हरली आहेस असे सागर सावनीला ठणकावून सांगतो. 

एक स्पर्धा जिंकल्याने मुक्ता माझ्यापेक्षा ग्रेट होत नाही असे सावनी म्हणते, त्यावर सागर सावनीला आरशात पाहा किती त्रास होतोय तुला हे लक्षात येईल असे म्हणतो. 

मुक्ताचे ऑफिसमध्ये उत्साहात स्वागत

मुक्ता ऑफिसमध्ये येताच ऑफिसचा स्टाफ तिचे स्वागत करतो. सागर-मुक्ताचे कर्मचारी कौतुक करतात. यावर चिडलेली सावनी सागरला प्रेम कसे व्यक्त करावे हे सांगते. गुलाबाच्या पाकळ्यांनी मुक्ताचे काय स्वागत करतो असे सांगते. हर्षवर्धनने मला 15 लाखाचे गिफ्ट दिले असल्याचे म्हणते. सावनी सागरला डिवचते. त्यावर मुक्ता सागरचे कौतुक करते. महागड्या गोष्टी देऊन प्रेम व्यक्त करण्यापेक्षा आपल्या आवडीच्या व्यक्तींची काळजी घेणे, विश्वास ठेवणे हे महत्त्वाचे असल्याचे म्हणते. मुक्ताच्या उत्तराने सावनीचा तिळपापड होतो. 

घृणेत सावनीचे गैरकृत्य

चिडलेली सावनी भर ऑफिसमध्ये मुक्ताचा ब्लाउज फाडते. सागर लागलीच मुक्ताला आपला सूट देतो. त्यावर मुक्ता नवऱ्याचा हात खांद्यावर असला की किती मोठे संकट आले तरी हिंमत मिळते. आपल्या माणसासाठी काळजी असावी लागते. त्यातून प्रेम व्यक्त होते. पण हे तुम्हाला कसे कळणार असे सावनीला मु्क्ता सुनावते. मुक्ता-सागरला खिजवण्यासाठी सावनी वेगळे प्रयत्न करते. पण, सावनीने टाकलेला प्रत्येक डाव तिच्यावर उलटतो.

सागर-आदित्य एकत्र येणार?

सागरला आदित्यची आठवण येते, त्याच्या आठवणीने तो हळवा होतो. मुक्ताला सागर आणि आदित्यला पुन्हा जवळ आणण्यासाठीचा विचार करते. त्यासाठी तिची खटपट सुरू होते. आता, यात तिला यश येणार का हे येत्या काही एपिसोडमध्ये दिसून येईल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget